शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

...तर शेतकऱ्यांची मुलेही आत्महत्या करतील; ‘सीईटी’च्या निर्णयावर सजग नागरिक मंचाची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 11:56 IST

इंजिनिअरिंग, फार्मसी आणि अ‍ॅग्रिकल्चर या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथमवर्ष प्रवेशासाठी येत्या १० मे रोजी प्रवेश पूर्वपरीक्षा (सीईटी) घेण्याचा निर्णय झाला आहे, या निर्णयावर सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी टीका केली आहे.

ठळक मुद्दे'अशा प्रकारे फक्त चार महिने आधी निर्णय घोषित करणे ही प्रशासनाची असंवेदनशील वृत्ती' किमान यंदा तरी अशी सीईटी देणे सक्तीचे करू नये : सजग नागरिक मंच

पुणे : इंजिनिअरिंग, फार्मसी आणि अ‍ॅग्रिकल्चर या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथमवर्ष प्रवेशासाठी येत्या १० मे रोजी प्रवेश पूर्वपरीक्षा (सीईटी) घेण्याचा निर्णय झाला आहे, या निर्णयावर सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी टीका केली आहे.आजपर्यंत गेली अनेक वर्षे बारावीनंतर कृषी पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेशासाठी १२ वीचे बोर्डाचे गुण आधारभूत होते. कोणतीही सीईटी त्यासाठी घेतली जात नव्हती. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना बारावीनंतर कृषी पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा आहे ते फक्त बारावी बोर्डचा अभ्यास करत होते. मात्र अचानक महाराष्ट्र सीईटी सेलने यंदापासून बारावीनंतर कृषी पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेशासाठी सीईटी घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. ही सीईटी अभियांत्रिकी, फार्मसीसाठी घेतली जाते, तीच सीईटी असणार आहे. ही परीक्षा १० मे रोजी होणार असून त्यासाठी अर्ज भरण्याची मुदत २५ मार्च आहे. कृषी पदवी अभ्यासक्रमासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर प्रवेश घेतात आणि आजवरच्या प्रथेप्रमाणे त्यांनी फक्त १२ वी बोर्ड परीक्षेचा अभ्यास केला आहे. आता अचानक केवळ ४ महिने अगोदर त्यांना कृषी पदवी अभ्यासक्रमासाठी सीईटी द्यावी लागणार आहे. हा निर्णय एक वर्ष आधी घोषित करणे शक्य होते.  मात्र तो अशा प्रकारे फक्त चार महिने आधी घोषित करणे हे प्रशासनाची असंवेदनशील वृत्ती दाखवते. इंजिनिअरिंग, फार्मसीसाठीच्या सीईटीसाठी ११ वी आणि १२ वी असा दोन्ही वर्षांचा अभ्यासक्रम असणार आहे हे लक्षात घेतले आणि याच परीक्षेच्या तयारीसाठी ज्यांना इंजिनिअरिंग, फार्मसीला प्रवेश घ्यायचा आहे ती मुले ११ वी पासून तयारी सुरु करतात, क्लास लावतात हे लक्षात घेतले तर कृषी पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना हा किती मोठा धक्का आहे, हे समजू शकते. आज वर या महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करत होते आता आता शेतकऱ्यांची मुले आत्महत्या करतील, अशी टीका विवेक वेलणकर यांनी केली आहे. सगळ्यात दुर्दैवाचा भाग म्हणजे आपल्याला अशी सीईटी द्यावी लागणार आहे हे सुद्धा अनेक विद्यार्थ्यांना (विशेषत: ग्रामीण भागातील) समजणार नाही आणि त्यांनी वेळेत अर्ज  भरला नाही तर त्यांची कृषी पदवी प्रवेशाची संधी हुकु शकते. त्यामुळे किमान यंदा तरी अशी सीईटी देणे सक्तीचे करू नये, अशी मागणी सजग नागरिक मंचातर्फे करण्यात आली आहे.

टॅग्स :Sajag Nagrik Manchसजग नागरिक मंचVivek Velankarविवेक वेलणकरPuneपुणे