आयुष्याच्या ८५ व्या वर्षी संघर्षाला सोबती घेऊन 'आजीबाईं'ना पोटापाण्यासाठी करावी लागतेय कसरत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2020 20:41 IST2020-07-24T20:34:16+5:302020-07-24T20:41:29+5:30
सोशल मीडियावर तुफान हिट आणि व्हायरल झालेला या आजींबाईंच्या व्हिडिओमुळे त्यांचा जगण्यासाठीचा संघर्ष नुकताच आला समोर

आयुष्याच्या ८५ व्या वर्षी संघर्षाला सोबती घेऊन 'आजीबाईं'ना पोटापाण्यासाठी करावी लागतेय कसरत!
पुणे : आयुष्यं म्हटलं की संघर्षही न चुकता आलाच. या संघर्षाला मग वयाचे बंधन तरी कोठे आले हो. ज्या वयात कुटुंबातील छोट्या छोट्या नातवंडांना अंगा खांद्यावर खेळवत तसेच देवाजीच्या नामस्मरणात घरात वेळ घालवायचा असतो तिथे एक आजीबाई दहा माणसांच्या कुटुंबाची जबाबदारी स्वतःच्या हिमतीवर पार पाडत आहे. वयाच्या ८५ व्या वर्षी शरीर साथ देत नसताना देखील त्यावर मात करत तरुणांना लाजवेल अशी थरारक 'कामगिरी'करत आहेत. सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेला व्हिडिओमुळे या आजींचे कष्ट व जगण्यासाठीचा संघर्ष नुकताच समोर आला आहे. या आज्जीबाईंचे नाव आहे शांताबाई पवार..
पुण्यातील हडपसर परिसरात या ८५ वर्षाच्या आजीबाई आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांनी तरुणपणी सीता और गीता शेरनी या हिंदी चित्रपटात काम केले. मात्र, आता ऊन , वारा, पाऊस एव्हाना कोरोनाकाळात देखील दोन वेळच्या अन्न पाण्यासाठी रस्त्यावर उतरुन मोठी कसरत करावी लागत आहे.पण सोशल मीडियावर त्यांचा एक काठी फिरवत असतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.हा व्हिडिओ पाहून अभिनेता रितेश देशमुख यांनीही त्यांचा हा काठी फिरवताना चा व्हिडिओ शेअर करत 'वॉरिअर आजी' असे त्याला कॅप्शन दिले.
या आजींचे कुटुंब मोठे आहे. घरची परिस्थिती हलाखीची आणि बिकट आहे. त्यामुळे नातवांची खाण्यापिण्याची आबाळ होऊ नये यासाठी शरीराची साथ मिळत नसतानासुध्दा कुटुंबासाठी त्या मोठ्या हिंमतीने नव्या जोशात लाठीकाठीचे प्रात्यक्षिके करुन दाखवत आहेत. त्यांची वाºयाच्या वेगाने गरगरा फिरणारी काठी पाहून सर्वच जण अवाक् होत आहेत. याअगोदर आजीबाइर् त्या रस्त्यावर डोंबा?्याचा खेळ सादर करत असत. मात्र, तीन महिन्यांपूर्वी एका खेळादरम्यान त्या खाली पडल्या आणि त्यांच्या हाताला जखम झाली. तेव्हापासून हा डोंबा?्याचा खेळ बंद झाला. परंतु, त्यानंतर सुध्दा शांताबाई थांबल्या नाही. पुन्हा एकदा नव्या उमेदीने रस्त्यावर उतरत रात्री एकटीने प्रात्यक्षिक दाखवण्यास सुरुवात केली. त्यातून मिळालेल्या पैशातून सध्या त्यांच्या कुटुंबियांची उपजीविका चालते आहे. सध्या त्यांच्या घरात सात नातवंडे आहेत. घर पत्र्याचं असूनही मिळेल त्या पैशातून त्या नातवंडांना सुखी ठेवण्याचा प्रयत्न करतात.
याबाबत शांताबाई पवार या आजींनी लोकमतशी संवाद साधताना आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करुन दिली. त्या म्हणाल्या, वयाच्या आठव्या वर्षीपासून वडिलांनी काठी चालविण्याचे प्रशिक्षण दिले.त्यानंतर तरुणपणी सीता और गीता शेरनी या हिंदी चित्रपटात धमेंद्र यांच्यावर चित्रित एका दृश्यात काम करण्याचा योग आला.
..........
पत्ता - सर्व्हे नं - 106, गोसावी वस्ती, बौद्धविहार जवळ वैदुवाडी, हडपसरपुणे.
आजींचा संपर्क - 9373611504 / 9552030396
Account details :
शांता बाळू पवार
बँक ऑफ महाराष्ट्र
अकाउंट नंबर : 60163754342
IFSC code : MAHB0000001
ब्रँच : पुणे हडपसर