शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात आयुक्तांच्या आदेशानंतरही सावकारकीचे गुन्हे दाखल करून घेण्यास पोलिसांची टाळाटाळ? वाचा काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2022 19:55 IST

स्थानिक पोलीस तर सावकारकी प्रकरणात तक्रार देण्यासाठी आलेल्या व्यक्तीचे ऐकूनही घेत नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली...

पुणे : सर्वसामान्य नागरिकांची खासगी सावकारांच्या जाचातून सुटका करण्यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (amitabh gupta) यांनी काही महिन्यांपूर्वी पुढाकार घेतला होता. छळवणूक करणाऱ्या सावकारांविरोधात तक्रार देण्यासाठी एक खास हेल्पलाइन तयार करण्यात आली होती. या हेल्पलाइनला प्रतिसाद मिळत आहे. सावकारांच्या पिळवणुकीला कंटाळलेले अनेक नागरिक स्वतःहून पुढे येत आहेत. पोलिसांसोबत संपर्क साधून तक्रार देत आहेत.परंतु पोलिसांकडूनच अशा प्रकारचे गुन्हे दाखल करून घेण्यासाठी टाळाटाळ होत असल्याचे उघड झाले आहे. स्थानिक पोलीस तर सावकारकी प्रकरणात तक्रार देण्यासाठी आलेल्या व्यक्तीचे ऐकूनही घेत नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, गुन्हे शाखेच्या एका पथकाकडे खासगी सावकाराच्या छळवणूकीचे प्रकरण आले होते. 85 हजार रुपये व्याजाने देऊन त्या बदल्यात साडेतीन लाख रुपये सावकाराने उकळले होते. या प्रकरणात संबंधित सावकाराला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. चौकशीदरम्यान त्याने 10 टक्के व्याज आकारत असल्याची कबुली दिली होती. त्यानंतर संबंधित सावकाराविरोधात पुरावे गोळा करण्यात आले. गुन्हा दाखल करण्याससंदर्भातली कागदपत्र तयार करून पुढील प्रक्रियेसाठी संबंधित पोलीस स्टेशनच्या निरीक्षक आणि विभागाच्या उपायुक्तांकडे पत्रव्यवहार केला होता. 

मात्र संबंधित पोलीस निरीक्षकाने गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली. वरिष्ठांची परवानगी घ्यावी लागेल असे म्हणत त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोनवर माहिती दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही "दोन दिवसानंतर पाहू" असं म्हणत वेळ वेळ काढूपणा करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गुन्हे शाखेचे कर्मचारी पुन्हा एकदा संबंधित सावकार आणि तक्रारदार व्यक्तीला घेऊन परिमंडळ कार्यालयात पोहोचले.  तेथे पत्र देऊन त्यांचा सहीशिक्का घेतला. दरम्यान यासाठी काही तास कालावधी लोटल्यानंतर संबंधित पथकाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फोन करून संबंधित पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना या तक्रारीबाबत विचारणा केली. या प्रकरणात टाळाटाळ होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी गुन्हे शाखेतील वरिष्ठांच्या कानावर हा सर्व प्रकार घातला. सायंकाळपर्यंत तरी या प्रकरणात गुन्हा दाखल झाला नव्हता. 

एकीकडे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शहरातील अवैध सावकारकी संपुष्टात आणण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे असे आवाहन केले. त्यासाठी स्वतंत्र हेल्पलाईन देखील तयार केली. आयुक्तांच्या या आवाहनानंतर या हेल्पलाइन क्रमांकावर फोन करून नागरिक पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी पुढाकार घेऊ लागलेत, मात्र स्थानिक पोलिस त्यांना दाद देत नसल्याचे यानिमित्ताने उघडकीस झाले आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस