शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
2
सनरायझर्स हैदराबादची फिल्डींग लैय भारी! आयुष बदोनी, निकोलस पूरन यांनी वाचवली LSG ची लाज
3
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
4
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
5
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
6
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
7
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
8
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
9
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
10
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
11
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
12
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
13
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
15
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
17
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
18
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
20
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...

आवक घटल्यानंतरही कांद्याचे दर उतरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2018 3:01 AM

होळी व धूलिवंदनाच्या सणामुळे कांदा आवकवर मोठा परिणाम झाला. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक ७८ हजार १०० पिशव्यांनी घटली. मागील आठवड्याच्या तुलनेत ही आवक सहा पटीने घटून भावही घसरले...

चाकण -  होळी व धूलिवंदनाच्या सणामुळे कांदा आवकवर मोठा परिणाम झाला. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक ७८ हजार १०० पिशव्यांनी घटली. मागील आठवड्याच्या तुलनेत ही आवक सहा पटीने घटून भावही घसरले, भावात २०० रुपयांची घसरण, कांद्याला प्रतिक्विंटल १३०० रुपये भाव मिळाला. कांदा आवक घटल्याने बाजार ओस पडला होता. कांद्याची साडेसहा कोटीची उलाढाल घसरून ८२ लाखांवर खाली आली.कांदा आवक घटल्याने बाजाराची उलाढाल ५ कोटीने घटली. चाकण बाजारात कांद्याची एकूण आवक ७४५० क्विंटल झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत ही आवक ३९०५० क्विंटलने घटून भावात २०० रुपयांनी घसरण झाली. कांद्याचा कमाल भाव १५०० रूपयांवरून १३०० रुपयांवर आला. तरकारी विभागात फळभाज्यांचे भाव घटले तर पालेभाजांचे भाव वधारले. जनावरांच्या बाजारात गाय, बैल, म्हैस व शेळ्या-मेंढ्यांच्या विक्रीत मोठी वाढ झाली. चाकण बाजारात एकूण ३ कोटी ६५ लाख रुपयांची उलाढाल झाली असल्याची माहिती सभापती चंद्रकांत इंगवले व सचिव सतीश चांभारे यांनी दिली.तळेगाव बटाट्याची एकूण आवक ७०० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक ५०० क्विंटलने घटली. बटाट्याचा कमाल भाव १२०० रुपयांवर स्थिर झाला. भूईमुग शेंगाची एकूण आवक १३ क्विंटल झाली. शेंगांचा कमालभाव ५५०० रुपयांवर स्थिरावला. लसणाची एकूण आवक १० क्विंटल झाली. लसणाचा कमाल भाव ३ हजार ५०० रुपयांवरस्थिरावला. चाकण येथील तरकारी बाजारात हिरवी मिरची कडाडली. हिरव्या मिरचीची एकूण १५५ पोती आवक झाली. हिरव्या मिरचीला ४००० ते ६००० प्रतिक्विंटल भाव मिळाला.१ होळी व धूलिवंदनाच्या सणामुळे चाकण बाजारात कांद्याची आवक ७८ हजार १०० पिशव्यांनी / ३९०५० क्विंटलने घटली.२ मागील आठवड्याच्या तुलनेत आवक सहा पटीने घटून भावही घसरले, भावात २०० रुपयांची घसरण, भाव १३०० रुपये क्विंटल.३ कांदा आवक घटल्याने बाजार ओस दिसत होता. कांद्याची साडेसहा कोटींची उलाढाल घसरून ८२ लाखांवर खाली आली.४ बटाटा आवक घटून भावात २०० रुपयांची वाढ, तरकारी विभागात फळभाजांचे भाव घटले, पालेभाजांचे भाव वधारले.५ जनावरांच्या बाजारात गाय, बैल, म्हैस, शेळ्या-मेंढ्यांच्या विक्रीत वाढ.६चाकण बाजारात एकूण ३ कोटी ६५ लाख रुपयांची उलाढाल. कांदा आवक घटल्याने बाजाराची उलाढाल ५ कोटींनी घटली.शेतमालाची एकूण आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे४कांदा - एकूण आवक - ७४५० क्विंटल, भाव क्रमांक १ : १३०० रुपये, भाव क्रमांक : ११०० रुपये, भाव क्रमांक ३ : ९०० रुपये.४बटाटा - एकूण आवक - ७०० क्विंटल, भाव क्रमांक १ : १२०० रुपये, भाव क्रमांक २ : ११०० रुपये, भाव क्रमांक ३ : ७०० रुपये.४भुईमूग शेंग -एकूण आवक १३ क्विंटल, भाव क्रमांक १ :५५००, भाव क्रमांक २: ५०००, भाव क्रमांक ३: ४५०० रुपये .४लसूण - एकूण आवक - १० क्विंटल, भाव क्रमांक १ : ३५०० रुपये, भाव क्रमांक २ : ३००० रुपये, भाव क्रमांक ३ : २५०० रुपये.४फळभाज्या : चाकण येथील फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक डागांमध्ये व प्रती १०० किलोंसाठी डागांना मिळालेले भाव पुढील प्रमाणे : टोमॅटो - ८९४ पेट्या ( २०० ते ४०० रू. ), कोबी - ३१८ पोती ( २०० ते ३०० रू. ), फ्लॉवर - ३९५ पोती ( ३०० ते ५०० रु.),४वांगी - २८५ पोती ( ५०० ते १००० रु.), भेंडी - ५३२ पोती ( १००० ते ३००० रु.), दोडका - १३० पोती ( २५०० ते ३५०० रु.),४कारली - १८५ डाग ( २००० ते ३००० रु.), दुधीभोपळा - १४२ पोती ( ५०० ते १००० रु.), काकडी - २४८ पोती ( १००० ते २००० रु.),४फरशी - ८४ पोती ( २००० ते ३००० रु.), वालवड - २१० पोती ( १००० ते २५०० रु.), गवार - १०९ पोती ( ३००० ते ४००० रू.),४ढोबळी मिरची - ४७१ डाग ( १००० ते २००० रु.), चवळी - १०४ पोती ( २००० ते ३००० रु ), वाटाणा - ७२८ पोती ( १५०० ते २५०० रु. ),४शेवगा - १९० डाग ( २००० ते ३००० रु. ), गाजर - १४९ पोती ( ८०० ते १२०० रु. )४पालेभाज्या : चाकण येथील पालेभाज्यांच्या बाजारात भाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व प्रती शेकडा जुड्यांना मिळालेले भाव पुढील प्रमाणे४मेथी - एकूण १३९४५ जुड्या ( २०० ते ५०० रुपये), कोथिंबीर - एकूण ११४९० जुड्या ( ३०० ते ७०० रुपये ),४शेपू - एकुण २९८५ जुड्या ( २०० ते ४०० रुपये), पालक - एकूण ४५५० जुड्या (१०० ते ३०० रुपये)४जनावरे : चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या १२५ जर्शी गायींपैकी ७५ गाईची विक्री झाली. ( १५,००० ते ४५,००० रुपये ),४२५० बैलांपैकी ११० बैलांची विक्री झाली. ( १०,००० ते २५,००० रुपये ), १८० म्हशींपैकी १२० म्हशींची विक्री झाली. ( २०,००० ते ६०,००० रुपये ),४शेळ्या - मेंढ्यांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ८९५० शेळ्या - मेंढ्यापैकी ८१५० शेळ्या-मेंढ्यांची विक्री होऊन त्यांना १२०० ते १०,००० रुपये इतका भाव मिळाला. जनावरांच्या बाजारात २ कोटी ५० लाखाची उलाढाल झाली. तर संपूर्ण बाजारात एकूण ३ कोटी ६५ लाखाची उलाढाल झाली.

टॅग्स :onionकांदाnewsबातम्या