शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

पैसे घेऊन तब्बल १७८ विद्यार्थ्यांचे गुण वाढविणाऱ्या मुल्यमापन प्रमुखाला पुण्यात अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2020 19:10 IST

हा प्रकार मॉडेल कॉलनीतील सिंम्बायोसिसमध्ये सप्टेंबर २०१८ ते डिसेंबर २०१९ दरम्यान घडला आहे.

ठळक मुद्देआरोपीने वापरलेले डिव्हाईस संगणक, हार्ड डिस्क, मोबाईल पेन्ड्राईव्ह जप्त

पुणे : स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी बनावट केस हिस्ट्रीज तयार करुन विद्यार्थ्यांच्या गुणांचे पुर्नमुल्यमापन करताना १७८ विद्याथ्याचे गुण वाढवून दिलेल्या मुल्यमापन प्रमुखाला सायबर पोलिसांनीअटक केली आहे. संदीप रामकृष्ण हेंगले (वय४९, रा. वृंदावन अपार्टमेंट, गणेशमळा, सिंहगड रोड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. सायबर पोलिसांनी त्यांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने अधिक तपासासाठी १९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली. हेंगले यांचा साथीदार सुमित कुमार याचा शोध घेतला जात आहे. हा प्रकार मॉडेल कॉलनीतील सिंबायोसिसमध्ये सप्टेंबर २०१८ ते डिसेंबर २०१९ दरम्यान घडला आहे. संदीप हेंगळे हे सिंबायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटीचे मुल्यमापन विभागाचे प्रमुख अधिकारी आहेत.  याबाबत पोलिसांनी न्यायालयात सांगितले की, यातील आरोपी हेंगले हा सिम्बायोसिस संस्थेमध्ये नोकरीला असताना त्यांनी स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी संस्थेच्या परस्पर संस्थेतील १७८ विद्यार्थीच्या बनावट केस हिस्टीज तयार केल्या व त्याद्वारे संस्थेस अंधारात ठेवून संस्थेच्या संगणक प्रणालीद्वारे १७८ विद्यार्थ्यांचे ग्रेस मार्क वाढविले आहेत.आरोपीने वापरलेले डिव्हाईस संगणक, हार्ड डिस्क, मोबाईल पेड्राईव्ह हे जप्त केले आहेत. गुन्हा करण्यासाठी आरोपीने इतर साथीदारांची मदत घेतल्याचे दिसून येत आहे. आरोपीने टोळी स्वरुपात काम केल्याचे दिसून येत आहे. १७८ विद्यार्थ्यांचे ग्रेस मार्क वाढविण्यासाठी आरोपीस पैसे मिळाले आहेत. संबंधित विद्यार्थी व आरोपी यांचा संपर्क कसा झाला व ग्रेस मार्क वाढविण्याच्या बदल्यात आरोपीस पैसे कसे मिळाले. १७८ विद्यार्थी हे पूर्ण भारतामधील आहेत. त्यामुळे आंतरराज्यीय टोळी स्वरुपाचा गुन्हा झाला आहे. ही संस्था नामांकित असून संस्थेमध्ये आरोपी एकटाच ग्रेस मार्कसाठी केस हिस्ट्रीज बनवु शकत नाही.त्यास संस्थेतील इतर कोणी मदत केली आहे का याचा तपास करायचा असल्याचे पोलिसांनी सांगितले.हा युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने १९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय