कोरोना बाधित रुग्णांवर तातडीने उपचार करण्यासाठी 'नामवंत डॉक्टरांच्या टास्क फोर्स'ची स्थापना: डॉ.दीपक म्हैसेकर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 12:59 PM2020-04-15T12:59:18+5:302020-04-15T13:02:12+5:30

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला पुण्यातील नामवंत आणि तज्ज्ञ डॉक्टर्स यांनी दिला अतिशय सकारात्मक प्रतिसाद

Establishment of 'Talented Doctor's Task Force' to promptly treat Corona infected patients | कोरोना बाधित रुग्णांवर तातडीने उपचार करण्यासाठी 'नामवंत डॉक्टरांच्या टास्क फोर्स'ची स्थापना: डॉ.दीपक म्हैसेकर

कोरोना बाधित रुग्णांवर तातडीने उपचार करण्यासाठी 'नामवंत डॉक्टरांच्या टास्क फोर्स'ची स्थापना: डॉ.दीपक म्हैसेकर

Next
ठळक मुद्देपुण्यातील कोरोनाचा वाढता मृत्यूदर कमी करण्यासाठी उपाययोजना  राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर पुण्यात मृत्युदर अधिक

पुणे : पुणे व पिंपरी चिंचवड महानगरातील कोराना-19 विषाणूच्या संसगार्ने रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण राज्य आणि राष्ट्रीय पातळीच्या मृत्यूदरापेक्षा जास्त आहे. वाढत जाणा?्या मृत्यूदरांचे प्रमाण कमी करण्याबरोबर कोरोना बाधित रुग्णांवर तातडीने उपचार करण्यासाठी पुण्यातील दहा नामवंत आणि तज्ज्ञ डॉक्टर्सचा टास्क फोर्स (कार्य बल गट) स्थापन करण्यात आला असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.
कोरोनाविरूद्धचा लढा अधिक आक्रमकपणे लढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला पुण्यातील नामवंत आणि तज्ज्ञ डॉक्टर्स यांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे हे डॉक्टर पुण्यातील कोरोना उपचार करणाऱ्या डॉक्टरांना मार्गदर्शन करणार आहेत.
------'
पुण्यातील पाच हॉस्पिटल्स कोवीड-19 क्रिटीकल केअर हॉस्पिटल म्हणून घोषित
पुण्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, दररोज मृत्युमुखी पडणा-यांचे प्रमाण देखील अधिक आहे. हा मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रशासनाने शहरातील पाच हॉस्पीटलसमध्ये विशेष सुविधा निर्माण केल्या आहेत. ही आहेत पाच हॉस्पीटलस 
1.    बी.जे.मेडीकल कॉलेज, ससून हॉस्पिटल, पुणे
2.    भारती विद्यापीठ हॉस्पिटल, पुणे
3.    सिम्बॉयसीस हॉस्पिटल,पुणे
4.    नायडू हॉस्पिटल,पुणे
5.    यशवंतराव चव्हाण स्मृती हॉस्पिटल, पिंपरी-चिंचवड

-----------
या टास्क फोर्समध्ये खालील डॉक्टर्स असतील
डॉ. दिलीप कदम, एसकेएन मेडीकल कॉलेज, नऱ्हे, पुणे
डॉ. शिवा अय्यर, भारती विद्यापीठ, पुणे
डॉ. भारत पुरंदरे, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, पुणे
डॉ. प्रसाद राजहंस, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, पुणे
डॉ. कपील झिरपे, रुबी हॉस्पिटल, पुणे
डॉ. जगदीश हिरेमठ, पुना हॉस्पिटल व रुबी हॉस्पिटल,पुणे
डॉ. अभय सदरे, बी.जे.मेडीकल कॉलेज, पुणे
डॉ. आरती किनीकर, बी.जे.मेडीकल कॉलेज,पुणे
डॉ. शितल धडफळे, बी.जे.मेडीकल कॉलेज, पुणे
डॉ. एस.ए. सांगळे, बी.जे.मेडीकल कॉलेज, पुणे

या टास्क फोर्सबरोबर पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग हे समनव्य साधणार आहेत.
----------- 
डेडिकेटेड कोविड रुग्णालय सुरू करणे, या रुग्णालयातील वैद्यकीय व्यवस्था, प्रत्येक रुग्णाला तो कोविडग्रस्त समजून उपचार सुरू करणे, चांगल्या सुसज्ज रुग्णवाहिका, कोविड आयसीयूमधील उपचार पद्धती यावर व अनुषंगिक उपचारांवर ही टीम देखरेखाही ठेवेल तसेच सल्ला देईल
- डॉ. दीपक म्हैसेकर, विभागीय आयुक्त

Web Title: Establishment of 'Talented Doctor's Task Force' to promptly treat Corona infected patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.