शहरं
Join us  
Trending Stories
1
बेपर्वाईचे ९ बळी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, वादळी वारा, अवकाळी पावसाचा तडाखा
2
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
3
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
4
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
5
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
6
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
7
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
8
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...
9
चुका नेहरूंच्या, मोदींना दोष कशासाठी? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल
10
सकाळी लोकलने, संध्याकाळी पावसाने मुंबईकरांना झोडपले; मध्य रेल्वेवर लोकल गोंधळामुळे तारांबळ
11
वादळी पावसाने मुंबईची अवस्था वाईट; हवामान खाते म्हणते, “आम्ही अलर्ट दिला होता”
12
जैन समाजाच्या समस्या सोडवण्यास नेहमीच तत्पर राहू; देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत यांची हमी
13
“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
नरेंद्र मोदींनाही ७५ वर्षांनंतर राजकारणातून निवृत्त करणार का?: रमेश चेन्नीथला यांचा सवाल
15
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
16
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
17
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
18
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
19
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
20
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!

कोठडीतून दोघांचे पलायन

By admin | Published: April 10, 2017 2:39 AM

खून प्रकरणातील दोन आरोपींनी खडकी पोलीस स्टेशनच्या कोठडीतून रविवारी पहाटे खिडकीचे गज कापून, जाळी उचकटवून पलायन केले.

पिंपरी चिंचवड : खून प्रकरणातील दोन आरोपींनी खडकी पोलीस स्टेशनच्या कोठडीतून रविवारी पहाटे खिडकीचे गज कापून, जाळी उचकटवून पलायन केले.टोळीचे वर्चस्व सिद्ध करण्याच्या उद्देशाने योगिराज शिवराज खंडागळे या तरुणाचा १२ दिवसांपूर्वी खून झाला. या प्रकरणातील सात आरोपींना ३ एप्रिलला खडकी पोलिसांनी गुलबर्गा, कर्नाटक येथून अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता, १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती. सोमवारी कोठडीची मुदत संपणार होती, मात्र ९ एप्रिलला पहाटे दोन आरोपींनी खिडकीचे गज वाकवुन, तारेची जाळी उचकटून कोठडीतून पलायन केले. खडकी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केलेल्या आरोपींमध्ये सिराज अल्लाद्दीन अमीर कुरेशी (वय ४०,रा. खडकी), सनी विजय अ‍ॅन्डी (वय २५, धानोरी विश्रांतवाडी) यांचा समावेश आहे. पोलिसांनी या दोन आरोंपींसह सनी ज्ञानेश्वर तायडे, योगेश उर्फ बालसुब्रह्मण्यम पिल्ले, रॉकी उर्फ डम्पी फ्रान्सीस मोती, आकाश दत्ता चांदणे, प्रकाश लिंग्या राठोड, आरिफ रियाज घोडेस्वार यांना ३ एप्रिलला पोलीस कोठडीत ठेवले होते. त्यांच्याबरोबरच्या ६ अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेण्यात आले होते. या आरोपींपैकी दोनजण पसार झाले. खडकी पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावणारे पोलीस अधिकारी बाजीराव चिमन ठोंबरे यांनी या घटनेची फिर्याद नोंदवली आहे. आरोपी पळून गेल्याने संबंधित पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास भोसले तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)