लोकमत न्युज नेटवर्क
मार्गासनी : स्वराज्याची पहिली राजधानी असलेला राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाल येथील
खंडोबाचा माळ या ठिकाणी शिवरायांचा अश्वारुढ पुतळा उभारला जाणार आहे. नुकतेच या जागेवर भुमिपुजन करण्यात आले. शिवशंभु प्रतिष्ठान अध्यक्ष महेश कदम, राष्ट्रसेवा समुहाचे अध्यक्ष राहुल पोकळे, सरपंच गोरक्ष शिर्के व बारा गाव मावळ
परिसरातील नागरिकांच्या हस्ते भुमिपुजनाचा कार्यक्रम पार पडला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी २५ वर्षे राजगडावरुन राज्यकारभार केला. याच राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या खंडोबाच्या माळावर चौथरा १३ फुट व अश्वारुढ पुतळा १२ फुट असे एकुण २५ फुट उंचीचा शिवरायांचा अश्वारुढ पुतळा लोकसहभागातुन उभारला जाणार आहे. या पुतळा उभारण्याचे काम पुणे येथील शिल्पकार महेंद्र थोपटे, सुधाकर रणखांबे यांच्याकडुन केले जाणार आहे. १२ जानेवारी राजमाता जिजाऊं मॅासाहेबांची जयंतीच्या निमित्ताने राजगडांच्या पायथ्याशी शिवरायांचा अश्वारुढ पुतळा उभा करण्यासाठीचे भुमिपुजन करण्यात आले. यावेळी शिवशंभु प्रतिष्ठान कात्रजचे अध्यक्ष महेश कदम, राष्ट्रसेवा समुह धायरी अध्यक्ष राहुल पोकळे, शिल्पकार महेंद्र थोपटे, सुधाकर रणखांबे, पालचे सरपंच गोरक्ष शिर्के, अमोल मानकर, अतुल पवार, अंकुश उंबरठकर, सुरेश
निगडे, राहुल ढेबे आदीसह परिसरातील शिवप्रेमी उपस्थित होते.
चौकटी
छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा खंडोबाचा माळ या ठिकाणी शासनाच्या सर्व ठिकाणच्या परवानग्या घेऊनच केले जाणार आहे. यासाठी पत्रव्यवहार सुरु केलेला आहे - राहुल पोकळे,अध्यक्ष राष्ट्रसेवा समुह
चौकट
शिवप्रेमी व लोकसहभागातुन छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभारण्यासाठी मदत घेतली जाणार आहे -
महेश कदम, शिवशंभु प्रतिष्ठान कात्रज
फोटो : ओळ खंडोबाचा माळ राजगड (ता.वेल्हे) शिवरायांच्या अश्वारुढ पुतळा उभारणार यासाठी भुमिपुजन करताना महेश कदम,राहुल पोकळे व इतर