शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

समतेच्या विचारांना हवी विज्ञानाची जोड : शरद पवार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2019 20:41 IST

महात्मा फुले यांनी त्यावेळीच हे ओळखले होते व जाहीरपणे त्याचा उच्चारही केला होता...

ठळक मुद्देरयतच्या एस.एम.जोशी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमअर्धपुतळ्यांचे अनावरण, शताब्दी टॉवर, आंतरराष्ट्रीय मुलींचे वसतीगृह व खेळाच्या मैदानाचेही उद्घाटन नव्या पिढीतील मुले विज्ञानाला गवसणी घालण्याची शक्ती मिळवतील व समाजाला उपयोगी पडणारे

पुणे: महात्मा फुले, राजर्षी शाहू यांचा समतेचा विचार आपण स्विकारला, मात्र त्यांनी स्विकारलेली विज्ञानदृष्टी दुर्लक्षित केली. आता ही चूक सुधारण्याची सुरूवात रयत शिक्षण संस्थेपासून झाली आहे. समतेच्या विचारांना विज्ञानाच्या दृष्टीची जोड द्यावी, असे आवाहन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केले.रयत च्या एस.एम.जोशी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात पवार यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ अणूशास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांच्या हस्ते विविध कार्यक्रमांचे उद्घाटन करण्यात आले. त्यातील लक्ष्मीबाई पाटील सेंटर फॉर इन्व्हेशन, इनोव्हेशन व इनक्युबेटर या अत्याधुनिक केंद्राचा समावेश होता. त्याशिवाय कर्मवीर भाऊराव पाटील, एस. एम. जोशी व रामभाऊ तुपे यांच्या अर्धपुतळ्यांचे अनावरण, शताब्दी टॉवर, आंतरराष्ट्रीय मुलींचे वसतीगृह व खेळाच्या मैदानाचेही उद्घाटन करण्यात आले.पवार म्हणाले, समतेला विज्ञानाची जोड द्यायला हवी होती. महात्मा फुले यांनी त्यावेळीच हे ओळखले होते व जाहीरपणे त्याचा उच्चारही केला होता. त्यांनी इंग्रज राजपुत्राला शेतीत सुधारणा करण्याची, संकरित बी-बियाणे वापरण्याची सुचना केली होती. शेतीला जोडधंदा हवा हेही त्यांनी सांगितले होते. ही विज्ञानदृष्टीच होती. मात्र त्याकडे आपण दुर्लक्ष केले. आता रयत च्या माध्यमातून यात सुधारणा होते आहे. अन्य संस्थांमध्येही याचपद्धतीने विज्ञानाचे शिक्षण द्यायला हवे. रयतने अशी अनेक केंद्र सुरू केली आहेत. त्यातून नव्या पिढीतील मुले विज्ञानाला गवसणी घालण्याची शक्ती मिळवतील व समाजाला उपयोगी पडणारे संशोधन करतील. काकोडकर म्हणाले, आयटीआय मध्ये शिकणारे वेगळे व महाविद्यालयात शिकणारे वेगळे अशी वर्गवारी आपल्याकडे केली जात होती. डोक्याने काम करणाऱ्यांना कौशल्याची आवश्यकता असते. संशोधन करणारे उपलब्ध उपकरणांचा वापर करून ते करतात, मात्र आपल्याला लागणारी उपकरणे आपणच तयार करायचे कौशल्य त्यांच्याकडे नसते. ते निर्माण व्हायला हवे.रयत मध्ये सतत नवे काहीतरी सुरू असते ही फार चांगली गोष्ट आहे, कॉल सेंटर सुरू करण्याचे व तेही अत्याधुनिक पद्धतीचे कामही रयतनेच केले.रयतचे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांनी प्रास्तविक केले. पुणे विद्यापीठाचे कुलगूरू नितीन करमळमकर यांचेही यावेळी भाषण झाले. हडपसरमधून आमदार झालेले व रयत च्या कार्यकारिणीचे सदस्य असलेले चेतन तुपे यांचा यावेळी पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. अरविंद बुरंगले व अन्य प्राध्यापकांच्या हस्ते सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. 

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारscienceविज्ञानFarmerशेतकरीagricultureशेती