पर्यावरण आॅलिम्पियाडला १६ आॅगस्टपासून सुरूवात होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 07:36 PM2018-08-13T19:36:26+5:302018-08-13T19:43:57+5:30

शाळांमध्ये पर्यावरण विषय शिकविण्यासाठी शिक्षक नाहीत, विद्यार्थ्यांचे अवांतर वाचन नाही, या सर्वांचा विचार करून विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा सुरू करण्यात आली आहे.

Environment Olympiad will start from 16th August | पर्यावरण आॅलिम्पियाडला १६ आॅगस्टपासून सुरूवात होणार

पर्यावरण आॅलिम्पियाडला १६ आॅगस्टपासून सुरूवात होणार

Next
ठळक मुद्देप्रत्येक गटातील पहिल्या १००० विद्यार्थ्यांना दुस-या व अंतिम फेरीमध्ये प्रवेश दिला जाणार या स्पर्धेसाठी  ४० हजारापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नावे नोंदवली मराठी, इंग्रजी आणि हिंदी अशा तीन भाषेमध्ये ही स्पर्धा

पुणे : गेल्या तीन वर्षांपासून पर्यावरण विषयक जनजागृतीसाठी तेर पॉलिसी सेंटरकडून आॅलिम्पियाड स्पधेर्चे आयोजन करण्यात येते. यंदाच्या वर्षी १६ आॅगस्टपासून या स्पर्धेला प्रारंभ होणार असून  या स्पर्धेसाठी  ४० हजारापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नावे नोंदवली आहेत. या स्पधेर्साठी शाळेत किंवा कुठल्याही सेंटरवर जाण्याची गरज नाही.  www.terregree संकेतस्थळावर ही परीक्षा विद्यार्थ्यांना द्यायची आहे. हे संकेतस्थळ १६ सप्टेंबरपर्यंत  स्पधेर्साठी खुले राहणार आहे. एक महिन्याच्या अवधीत चोवीस तासात कधीही विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकणार आहेत, हेच या स्पर्धेचे वैशिष्ट्य आहे. 
तेर पॉलिसी सेंटरच्या संस्थापक अध्यक्ष विनिता आपटे यांनी ही माहिती सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. त्या म्हणाल्या, आज शाळांमध्ये पर्यावरण विषय शिकविण्यासाठी शिक्षक नाहीत, विद्यार्थ्यांचे अवांतर वाचन नाही, या सर्वांचा विचार करून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाची गोडी वाढावी आणि त्यांच्यामध्ये पर्यावरणाविषयीची जनजागृती व्हावी यासाठी विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा सुरू करण्यात आली आहे. यंदाच्या वर्षी स्पर्धेत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला असून ही स्पर्धा तीन गटात होणार आहे. इयत्ता ५वी ते ९वी करिता  रोप,१० वी ते १२ वी साठी  वनस्पती आणि प्रथम ते तृतीय वर्षांसाठी झाड अशी विभागणी करण्यात आली आहे. प्राथमिक फेरीमधून प्रत्येक गटातील पहिल्या १००० विद्यार्थ्यांना दुस-या व अंतिम फेरीमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. या फेरीत रोप आणि वनस्पती या गटातील प्रथम वीस येणा-या विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात येणार आहेत तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय कंपनीत इंटर्नशीप करण्याची किंवा राष्ट्रीय उद्यानाला भेट देण्याची संधी मिळणार आहे. मराठी, इंग्रजी आणि हिंदी अशा तीन भाषेमध्ये ही स्पर्धा घेण्यात येईल. तीस मिनिटांच्या वेळेत ५० प्रश्न विद्यार्थ्यांनी सोडवायचे आहेत. 
----------------------------------------------------
पुण्या-मुंबईकडून स्पर्धेला प्रतिसाद कमी
गेल्या तीन वर्षांपासून दक्षिण प्रांत आणि जम्मू काश्मीर भागातल्या शाळांमधून स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण महाराष्ट्रामध्ये इतर भागांपेक्षा पुण्या-मुंबईमध्ये स्पर्धेला प्रतिसाद कमी मिळतो. ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये इंटरनेटच्या सुविधा नसल्यामुळे त्यांना आॅनलाईन स्पर्धा देणे शक्य होत नाही. यासाठी  त्या विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्याचा विचार असल्याचे विनिता आपटे यांनी सांगितले.

Web Title: Environment Olympiad will start from 16th August

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.