Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटलांच्या रॅलीतील वाहनांची पुणे शहरात एंट्री
By प्रशांत बिडवे | Updated: January 24, 2024 16:43 IST2024-01-24T16:42:43+5:302024-01-24T16:43:36+5:30
दरम्यान, संचेती चौकात पुणेकरांनी पाण्याच्या बाटल्या देत रॅलीतील नागरिकांचे स्वागत करीत होते....

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटलांच्या रॅलीतील वाहनांची पुणे शहरात एंट्री
पुणे : मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मुंबईकडे जाणाऱ्या रॅलीतील वाहनांचे दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास संचेती चौकात आगमनास सुरुवात झाली. वाहनातील कार्यकर्ते, आंदोलकांनी 'एक मराठा लाख मराठा', 'जय भवानी जय शिवाजी', आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं' आदी जल्लोषात घोषणाबाजी करीत शहरात एन्ट्री केली.
मराठवड्यातील बीड, परभणी, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह बीड जिल्ह्यातील गेवराई, वडवणी, पाटोदा, केज, माजलगाव, परळी आदी सर्वच तालुक्यातील गावामधून मोठ्याप्रमाणात आलेल्या शेकडो वाहनांचा समावेश होता. दरम्यान, संचेती चौकात पुणेकरांनी पाण्याच्या बाटल्या देत रॅलीतील नागरिकांचे स्वागत करीत होते.