शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

उद्योजक गायकवाड पिता पुत्रांना अखेर अटक; कर्नाटकातील उडपीतून घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 22:12 IST

याप्रकरणात चतु:श्रृंगी पोलिसांनी ज्योतिषी रघुनाथ येमूल याला ही अटक केली होती. त्याच्या भविष्यवाणीवरुनच गायकवाड कुटुंबाने सुनेचा छळ केल्याचे उघड झाले आहे.

पुणे : सूनेचा छळ करण्याबरोबरच पुणे शहर व पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील आणि विविध पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे तसेच दोन्ही आयुक्तालयाकडून मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या उद्योजक गायकवाड पिता पुत्राला बुधवारी पुणे शहर पोलिसांनी कर्नाटक मधील उडपी येथून अटक केली आहे.मोक्का लावल्यानंतर काही तासाच्या आत पोलिसांनी गायकवाड पिता पुत्राला अटक केली आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहर पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.गणेश उर्फ केदार नानासाहेब गायकवाड आणि नानासाहेब शंकर गायकवाड (दोघे रा. आय.टी.आय. रोड, औंध,पुणे) अशी अटक केलेल्यांची नाव आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर गणेश हा दक्षिणेत फिरत असल्याचे पोलिसांना तपासात आढळून आले होते. तो तिरुपतीलाही गेल्याचे आढळले होते. शेवटी दक्षिणेतच त्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले.

नानासाहेब गायकवाड हे मोठे उद्योजक आहेत तर गणेश गायकवाड हा एका पक्षाचा पदाधिकारी होता. त्याला राजकीय पक्षाने पक्षातून काढून टाकलं आहे.गणेश गायकवाड आणि नानासाहेब गायकवाड यांच्याविरूध्द सुनेच्या छळ केल्याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याप्रकरणात चतु:श्रृंगी पोलिसांनी ज्योतिषी रघुनाथ येमूल याला ही अटक केली होती. त्याच्या भविष्यवाणीवरुनच गायकवाड कुटुंबाने सुनेचा छळ केल्याचे उघड झाले आहे.

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात देखील गायकवाड पिता पुत्रावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गायकवाड पिता पुत्रासह इतरांविरूध्द मोक्काअंतर्गत कारवाई केली होती. मोक्काअंतर्गत कारवाई केल्यानंतर काही तासातच गणेश आणि नानासाहेब गायकवाड यांना अटक करण्यात यश आले आहे.

सहाय्यक पोलिस आयुक्त बजरंग देसाई आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. गायकवाड बाप-लेकास ताब्यात घेण्यात आलं असून त्यांना कायदेशीरबाबी पुर्ण करून गुरुवारी पुणे न्यायालयात हजर करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकbusinessव्यवसाय