मुठेचा गळा आवळणाऱ्यांच्या चौकशीचे हरित लवादाकडून आदेश : पाटबंधारे विभागाच्या झोपा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 11:44 IST2019-07-26T11:31:56+5:302019-07-26T11:44:37+5:30
अत्यंत नियोजनपूर्वक थेट मुठा नदीचा प्रवाह बदलून केलेल्या या अतिक्रमणाकडे पाटबंधारे विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.

मुठेचा गळा आवळणाऱ्यांच्या चौकशीचे हरित लवादाकडून आदेश : पाटबंधारे विभागाच्या झोपा
पुणे : नदी अतिक्रमणाचा नवाच पराक्रम पुण्यात उघडकीस आला आहे. नदीच्या प्रवाहामध्येच टप्प्या-टप्प्याने हजारो ट्रक राडारोडा टाकून केवळ पाच वर्षांत तब्बल साडे तीन एकर जागेवर अतिक्रमण केल्याचा प्रकार नांदेड सिटीलगतच्या मुठा नदी पात्रात घडल्याचा आरोप स्वयंसेवी संस्थांनी केला आहे. अत्यंत नियोजनपूर्वक थेट नदीचा प्रवाह बदलून केलेल्या या अतिक्रमणाकडे पाटबंधारे विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले; यात कोणाकोणाचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत, याचाही तपास करण्याची मागणी पुढे आली आहे.
नांदेड सिटीलगतच्या एका आश्रमा शेजारी मुठा नदी पात्रात सन २०१४ मध्ये प्रवाह बदलण्यासाठी समांतर रेषेमध्ये खोदाई करण्यात आली. त्यानंतर सन २०१५ मध्ये ही खोदाई अधिक मोठ्या प्रमाणात केली गेली. त्यानंतर सन २०१६ मध्ये नदीच्या प्रवाहमध्ये पूर्णपणे बदल करून नदी पात्रातील तीन ते साडे तीन एकर तुकडा शिवणे गावाच्या हद्दीतून नांदेड गावाच्या हद्दीत आणला गेला.
मुळा-मुठा नद्यांमध्ये गेल्या काही वर्षांत जाणीवपूर्वक मोठ्या प्रमाणात राडारोडा टाकून जमिनी निर्माण केल्या जात आहेत. थेट नदी पात्रात करण्यात आलेल्या अतिक्रमाणांमुळे पुणे शहराला भविष्यात मोठ्या पुराचा धोका निर्माण होणार आहे. थेट नदी पात्रातअतिक्रमणे होत असताना पाटबंधारे विभाग, पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका, पीएमआरडीकडून जाणीवपूर्वक अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे.
--------------------------------
असा बदला मुठा नदीचा प्रवाह आणि झालेले अतिक्रमण
१) सन २०१४ : शिवणे आणि नादेंड सिट लगत असा होता मुठा नदीचा प्रवाह
१) सन २०१५ : नदीचा प्रवाह बदलण्यासाठी मुठा नदीच्या (शिवणे) साईटच्या किना-यालगत समांतर रेषेत खोदाई करण्यात आली.
ॅ२) सन २०१६ : अधिक खोदाई करुन प्रवाह मोठ्या प्रमाणात बदलण्यात आला.
३) सन २०१७ : शिवणे गावालगत असलेले मुठा नदीचे पात्र नादेंड गावाच्या हद्दीत आले.
४) सन २०१८ : दरम्यान प्रवाह बदलून नदीपासून तोडण्यात आलेल्या भागावर लाखो ट्रक राडाराडा टाकून तीन ते साडे तीन एकरची जमिन तयार करण्यात आली.
५) सन २०१९ : सध्या या जागेवर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण व सिमेंट काँक्रिटचे काम सुरु
---------------------
मुळा-मुठा नदीच्या पात्रात तब्बल १२ ठिकाणे थेट नदी पात्रात राडारोडा टाकून जमिन तयार करण्यात आल्या
- बाबासाहेब आंबेडकर पुल, पिंपळे निलख
- पिंपळे सौंदागर
- पिंपळे गुरव, कासारवाडी (पवना नदी)
- पिंपळे गुरव
- कर्मवीर भाऊराव पाटील रस्ता, सांगवी (पवना नदी)
- मुळा नदी आणि राम नदी संगम, पिंपळे निलख
- डेक्कन जिमखाना, संभाजी उद्यान
- संगमवाडी रोड
- संगम पुल
- नादेंड व शिवणे गाव
- नादेंड व शिवणे गाव