फुलेवाडय़ातून प्रबोधनाचा एल्गार

By Admin | Updated: December 12, 2014 00:08 IST2014-12-12T00:08:05+5:302014-12-12T00:08:05+5:30

येत्या 25 जानेवारीला महात्मा फुले वाडय़ातून प्रबोधन प्रचार मोहिमेचा राज्यस्तरीय प्रारंभ करण्याचा निर्णय गुरुवारी (दि. 11) झालेल्या बैठकीत करण्यात आला.

Enlightenment from Fulewad's Enlightenment | फुलेवाडय़ातून प्रबोधनाचा एल्गार

फुलेवाडय़ातून प्रबोधनाचा एल्गार

पुणो : दलित, आदिवासींवरील अत्याचाराला प्रतिबंध करण्यासाठी राज्यात सामाजिक अत्याचार प्रतिबंधक चळवळीच्या माध्यमातून येत्या 25 जानेवारीला महात्मा फुले वाडय़ातून प्रबोधन प्रचार मोहिमेचा राज्यस्तरीय प्रारंभ करण्याचा निर्णय गुरुवारी (दि. 11) झालेल्या बैठकीत करण्यात आला. 
खैरलांजी ते जवखेडे खालसा तिहेरी हत्याकांडार्पयत असे जातीय अत्याचारांचे प्रमाण वाढले आहे. त्याला रोखण्यासाठी राज्यभर चळवळ उभारण्यात येणार आहे. तसेच  तालुका, जिल्हा पातळीवरही समित्या स्थापन करण्यात येणार असून, त्या माध्यमातून पीडित कुटुंबाला तत्काळ मदत देऊन आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी ही चळवळ काम करणार आहे, असे श्रमिक  मुक्ती दलाचे डॉ. भारत पाटणकर यांनी सांगितले. 
या वेळी लाल निशाणचे भीमराव बनसोड, सेक्युलर मुव्हमेंटचे प्रा. गौतमीपुत्र कांबळे, श्रमिक मुक्ती दलाच्या डॉ. गेल ऑम्वेट, कॉ. संपत देसाई, अंकुश शेडगे, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाच्या प्रतिमा परदेशी, किशोर ढमाले, सत्यशोधक जनआंदोलनाचे किशोर जाधव तसेच कॉ. भालचंद्र कांगो आदी उपस्थित होते. श्रमिक सभागृहात ही कार्यकत्र्याची बैठक झाली. जात व्यवस्थेच्या उच्चटनासाठी कृती कार्यक्रमाची आखणी करून त्यासाठी राज्यभर व्यापक लढा आणि प्रबोधन कार्यक्रम ठरविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी महामेळावा घेण्यात येणार असून, त्यासाठी जिल्हा, तालुकापातळीवर प्रबोधन करण्यात येणार आहे. 
बैठकीत मुख्य निमंत्रक म्हणून भारिप बहुजन महासंघाचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांची निवड करण्यात आली. शैलेंद्र कांबळे, कॉ. भालचंद्र कांगो, किशोर जाधव, संग्राम सावंत यांची निमंत्रक म्हणून निवड करण्यात आली. तसेच कार्यकारी निमंत्रक म्हणून प्रतिमा परदेशी, भीमराव बनसोड, डॉ. भारत पाटणकर यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. अत्याचार प्रतिबंधक चळवळीत सहभागी सर्व संघटनांचा एक प्रतिनिधी सहनिमंत्रक असेल, असे ठरविण्यात आले. आढावा घेण्यासाठी 11 जानेवारीला पुण्यात बैठक होणार आहे. जातीअंतासाठी लांब पल्ल्याचा कार्यक्रम काय असावा, याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली. नागरिकांना संघटित करण्यासाठी बैठक घेणार असल्याचे किशोर ढमाले यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
 
4तालुका, जिल्हापातळीवर जलद कृती दल तयार करणार
4कृती कार्यक्रम आणि माहिती प्रसारण यंत्रणा उभारणो
4अत्याचाराच्या घटनांसदर्भात वकिलांमधून प्रबळ समर्थन देणारे संच संघटित करणो
4महाराष्ट्रभर फिरून सर्व शोषित जनतेला एकत्र आणण्याचा कालबद्ध दौरा आखणो
4लाख-दीड लाख स्त्री-पुरुषांनी एकत्र येऊन जातीअंत, अत्याचार निवारण आणि प्रतिबंध करण्यात सहभागी होण्याबाबत शपथ घेतील.
 
जवखेडेबाबत पोलिसांची भूमिका संशयास्पद
4जवखेडे हत्याकांडाच्या तपास प्रक्रियेत पोलिसांची भूमिका संशयास्पद वाटते. ख:या आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत आहे. सरकार फॅसिस्ट पद्धतीने व्यवहार करीत असल्याने तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. चाजर्शीट दाखल झाल्यानंतर याबाबत नेमकी भूमिका घेण्यात येणार आहे. 

 

Web Title: Enlightenment from Fulewad's Enlightenment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.