शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

'कोविड'मुळे इंग्रजी माध्यम शाळा अडचणीत; शासनाने ठोस धोरण राबविण्याची 'मेस्टा'ची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2021 14:29 IST

जिल्ह्यातील सुमारे १ हजार शाळा, सुमारे २५ हजार शिक्षक व शिक्षकतेर कर्मचारी अडचणीत आले आहेत.

बारामती : कोविडमुळे जिल्ह्यातील इंग्रजी माध्यंमाच्या शाळा अडचणीत आल्या आहेत. त्यामुळे इंग्रजी माध्यमांच्या शाळांसाठी ठोस धोरण राबवून शासनाने मदत केली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र इंग्लिश स्कुल ट्रस्टीज असोसिएनने (मेस्टा) केली आहे. जिल्हाध्यक्ष सतीश सांगळे व उपाध्यक्ष दत्तात्रेय माळशिकारे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी यांच्याकडे संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील सुमारे १ हजार शाळा, सुमारे २५ हजार शिक्षकशिक्षकतेर कर्मचारी अडचणीत आले आहेत. आरटीई कायद्यानुसार दरवर्षी आर्थिक आणि सामाजिक दुर्बल घटकातील २५% विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मोफत प्रवेश दिला जातो. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची तरतूद या शिक्षण हक्क कायद्यामध्ये करण्यात आली आहे . या कायद्यानुसार ,प्रवेशित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क त्याच शैक्षणिक सत्रामध्ये सरकारला शाळांना देणे  बंधनकारक असताना  यासंदर्भात इंग्रजी शाळांनी शिक्षण विभाग व राज्य सरकारकडे वेळोवेळी मागणी करूनही प्रतिपूर्ती ची रक्कम थकीत आहे.

यावर्षी मोठ्या प्रमाणात पालकांनी त्यांच्या पाल्याचे शैक्षणिक शुल्क थांबवले आहे  कोविड मुळे उद्भवलेल्या या संकटात सरकारने इंग्रजी शाळांना मदत करणे गरजेचे असताना अशी कुठलीही मदत सरकारने केली नाही व हक्काची आरटीई ची प्रतिपूर्ती सुद्धा शासनाने दिली नाही, त्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळा आर्थिक कोंडीत सापडल्या आहेत. सरकारी शाळामंध्ये ९५ हजार रुपये प्रत्येक विद्यार्थ्यांमागे खर्च शासन करते. मात्र, खासगी शाळांमध्ये मूलभूत फरक आणि बदल आहेत. ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी शाळांना मोठा खर्च येत आहे.  पालकांकडून मोठ्या प्रमाणावर  फी येणे बाकी आहे. त्यामुळे शाळांच्या गाड्यांचे हप्ते, इमारतीचे भाडे, वीज बिल, शिक्षकांचे पगार हे  थकलेले आहेत.त्यामुळे  इंग्रजी माध्यमांच्या शाळाना मदत करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे . 

यावेळी बारामती तालुकाध्यक्ष राहुल बनकर, पुरंदर तालुकाध्यक्ष बाळासाहेब झगडे, दौंड तालुकाध्यक्ष मच्छिंद्र कदम, भोर तालुकाध्यक्ष दत्तात्रेय साळवी, दत्तात्रेय काळे उपस्थित होते.

टॅग्स :Baramatiबारामतीenglishइंग्रजीSchoolशाळाTeacherशिक्षकcorona virusकोरोना वायरस बातम्याState Governmentराज्य सरकारStudentविद्यार्थी