शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

अभियांत्रिकी, वैद्यकीयची प्रवेशप्रक्रिया गुरूवारपासून 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 20:15 IST

नीट परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. त्यामुळे विद्यार्थी व पालकांना आता प्रवेश प्रक्रियेचे वेध लागले आहेत.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांना आॅनलाईन नोंदणी व अर्ज भरण्यासाठी त्यांचे संकेतस्थळ सुरू संकेतस्थळावर जाहीर

पुणे : प्रथम वर्ष वैद्यकीय, अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया गुरूवारपासून ( दि. ७ जुन) सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना सुरूवातीला अभ्यासक्रमनिहाय आॅनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतर गुणवत्ता यादी प्रसिध्दी करून त्यानुसार प्रवेश प्रक्रिया होईल. या प्रवेश प्रक्रियेबाबतची सविस्तर माहिती बुधवारी (दि. ६) राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून प्रसिध्द केली जाणार असल्याची माहिती कक्षाचे आयुक्त आनंद रायते यांनी दिली. अभियांत्रिकी, कृषी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी सीईटी परीक्षेचा निकाल( दि. २ जून) ला तर एमबीबीएस, बीडीएस अन्य आरोग्यविज्ञान अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीट परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. त्यामुळे विद्यार्थी व पालकांना आता प्रवेश प्रक्रियेचे वेध लागले आहेत. या सर्व अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सीईटी सेलकडून राबविली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे लक्ष सेलच्या परिपत्रकांकडे लागले आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशाबाबत वैद्यकीय शिक्षण संचालनालयाकडून सीईटी सेलला सोमवारीच प्रस्ताव देण्यात आला आहे. ही प्रक्रिया गुरूवार (दि. ६) पासून सुरू करण्याबाबत त्यात सुचविण्यात आले आहे. अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया दि. ७ जूनपासून सुरू होणार असल्याचे तंत्रशिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे औषधनिर्माणशास्त्रची प्रक्रियाही त्यासोबत सुरू होऊ शकते. एकुण दहा कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया पुढील आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेकडून ही प्रक्रिया दि. ११ जूनपासून सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव सेलकडे देण्यात आला आहे. त्यावर सेलकडून शिक्कामोर्तब झाल्यानंतर प्रक्रिया सुरू होईल. त्यामुळे येत्या आठवडाभरात या सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरूवात होणार असल्याने प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना फार काळ वाट पाहवी लागणार नाही.

सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी सुरूवातीला विद्यार्थ्यांना आॅनलाईन नोंदणी व अर्ज भरून घेतले जातील. त्यानुसार गुणवत्ता यादी प्रसिध्द केली जाईल. विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर प्रवेश निश्चित होईल. याबाबतचे सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल................अभियांत्रिकी, वैद्यकीय, औषधनिर्माणशास्त्र व एमबीए या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया गुरूवारपासून (दि. ७) सुरू करण्याबाबत संबंधित विभागांना सांगण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना आॅनलाईन नोंदणी व अर्ज भरण्यासाठी त्यांचे संकेतस्थळ सुरू होतील. याबाबतची अधिसुचना बुधवारी प्रसिध्द केली जाईल. कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाबाबत कृषी परिषदेने काही दिवस वेळ मागितला आहे. त्यामुळे ही प्रक्रिया पुढील आठवड्यात सुरू होऊ शकेल. - आनंद रायते, आयुक्त 

 

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीMedicalवैद्यकीयeducationशैक्षणिकonlineऑनलाइन