शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

इंजिनीअरने केले टेरर फंडिंग; दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्याच्या साथीदाराला रत्नागिरीतून एटीएसने उचलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2023 11:24 IST

या सर्वांना न्यायालयाने ५ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी मंजूर केली आहे.

पुणे : कोथरूडमध्ये अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याच्या आणखी एका साथीदारास राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) रत्नागिरी परिसरातून अटक केली. शिनाब नसरुद्दीन काझी (वय २७, रा. काेंढवा, मूळ रत्नागिरी) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी अटक केलेल्यांची संख्या चार झाली आहे. या सर्वांना न्यायालयाने ५ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी मंजूर केली आहे.

पुण्यात पकडलेल्या दोघा दशतवाद्यांच्या तपासातून रोज धक्कादायक माहिती समोर येत आहे.  आंबोलीच्या जंगलात बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांनी मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्यात लक्ष्य ठरलेल्या छबड हाऊसची रेकी केल्याचे समोर आले आहे. पुण्यासह मुंबईही दहशतवाद्यांच्या रडावर होती, हे स्पष्ट झाले आहे.

काझी हा एका आयटी कंपनीत मॅकेनिकल इंजिनीअर म्हणून नोकरी करतो. त्याला १५ लाख रुपयांचे पॅकेज आहे. असे असतानाही तो या रतलाम मॉडेलमध्ये सक्रिय असल्याचे दिसून आले आहे. तो पुण्यात अब्दुल कादिर दस्तगीर पठाण याच्या संपर्कात आला असल्याचे एटीएसचे म्हणणे आहे. त्याने इम्रान खान व युनूस साकी यांची राहण्याची व्यवस्था करण्यासाठी आर्थिक मदत केली असल्याचे समोर आले आहे.

कोथरूड पोलिसांनी मोहम्मद इम्रान युनूस खान आणि युनूस याकूब साकी (दोघे रा. रतलाम, मध्य प्रदेश, सध्या रा. कोंढवा) या दोघांना पकडले. या दोघांना आश्रय दिल्याच्या आरोपावरून मूळच्या गोंदियामधील आणि सध्या कोंढवा परिसरात वास्तव्याला असलेल्या अब्दुल कादिर दस्तगीर पठाण याला पोलिसांनी अटक केली होती. या तिघांची एकत्रित चौकशी सुरू आहे. तपासात काझी याने आर्थिक रसद पुरवल्याची माहिती पुढे आली. त्याला शुक्रवारी अटक झाली. 

अंबोलीच्या जंगलात सराव; मुंबईतील छबड हाऊसची रेकी - हे दहशतवादी कोल्हापूरला गेले होते. तेथे मुक्काम केल्यानंतर ते निपाणीला गेले. तेथे एक दिवस मुक्काम केला. त्यानंतर संकेश्वर येथे गेले. - अंबोलीच्या जंगलात त्यांनी तंबू ठोकून मुक्काम केला. तेथे त्यांनी तेथे बॉम्बचे प्रशिक्षण घेतल्याची जागा या दहशतवाद्यांनी एटीएसला दाखविली. या तंबूचे साहित्य जप्त करण्यात आले. - त्या परिसराचे परीक्षण करून आवश्यक ते साहित्य फॉरेन्सिक तज्ज्ञांनी गोळा केले. त्यांनी मुंबईतील छबड हाऊसची रेकी केल्याचे समोर आले आहे. त्यांचा म्होरक्या खान फरार आहे.    

टॅग्स :TerrorismदहशतवादterroristदहशतवादीRatnagiriरत्नागिरीPuneपुणेPoliceपोलिस