शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

प्रशस्त इमारतीमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता

By admin | Updated: February 28, 2015 02:19 IST

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण कार्यालयात अपुरे कर्मचारी आहेत. येथील ८४ जागा रिक्त आहेत. अधिकारी, कर्मचा-यांची कमतरता

मंगेश पांडे, पिंपरीपिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण कार्यालयात अपुरे कर्मचारी आहेत. येथील ८४ जागा रिक्त आहेत. अधिकारी, कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने काही पदांवर निवृत्त कर्मचाऱ्यांची मानधनावर नेमणूक करण्यात आली आहे. यासह कंत्राटी कर्मचाऱ्यांचीही नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या जीवावरच प्राधिकरणाचा गाडा सुरू आहे. इमारत प्रशस्त, पण कर्मचाऱ्यांची कमतरता अशी अवस्था प्राधिकरण कार्यालयाची झाली आहे.आकुर्डी रेल्वेस्थानकाजवळ ४२ कोटी रुपये खर्चून उभारलेल्या पर्यावरणपूरक सात मजली इमारतीचे उद्घाटन ८ फेबु्रवारी २०१३ ला झाले. या इमारतीतून प्राधिकरणाचा कारभार चालत असला, तरीही पुरेसा कर्मचारी वर्ग नसल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांवर ताण येत आहे. प्राधिकरणात सुरुवातीला मोठी कर्मचारीभरती झाली. त्यानंतर अद्याप मोठ्या प्रमाणात भरती झालेली नाही. दरम्यानच्या काळात बहुतांश कर्मचारी, अधिकारी निवृत्त झाले. मात्र, त्यांच्या जागी पुन्हा नव्याने भरती करण्यात आली नाही.सध्या प्राधिकरणात भांडार विभाग, माहिती व जनसंपर्क, भू-विभाग, प्रशासन व अतिक्रमण निर्मूलन, अभियांत्रिकी, नियोजन विभाग, लेखा व वित्त, विद्युत आदी विभाग आहेत. मंजूर कर्मचाऱ्यांची संख्या १९५ आहे. त्यातील ८४ जागा रिक्त आहेत. यामध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी, कनिष्ठ लिपिक, कनिष्ठ अभियंता या पदांचा समावेश आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, अशी तक्रार येथील कर्मचाऱ्यांची आहे. सध्या प्राधिकरणातील १२ अधिकाऱ्यांवर त्यांच्या विभागासह इतर महत्त्वाच्या विभागांचीही जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे मूळ जबाबदारी असलेल्या विभागाचेही कामकाज व्यवस्थितरीत्या पाहणे शक्य होत नाही. तसेच भरती होत नसली, तरी कामकाज व्यवस्थित सुरू राहावे, यासाठी २० लिपिक कंत्राटी पद्धतीने नेमण्यात आले आहेत, तर प्राधिकरणातीलच निवृत्त कर्मचाऱ्यांनाही मानधन तत्त्वावर पुन्हा कामावर घेण्यात आले आहे. यामध्ये ५८ ते ६५ वयोगटातील २० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.