आगीचा अलार्म वाजल्याने पुण्यातील आयसीसी टॉवरमधील कर्मचाऱ्यांची धांदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 16:13 IST2018-01-18T16:10:50+5:302018-01-18T16:13:39+5:30
सेनापती बापट रस्त्यावरील आयसीसी ए विंगमध्ये टॉवरमधील कर्मचाऱ्यांची दुपारी धांदल उडाली. अचानक आगीचा अलार्म वाजल्याने कर्मचारी इमारतीमधून बाहेर आले. मात्र अग्निशामक दलाने तपासणी केल्यानंतर अग्निशामक पॅनलमध्ये दोष असल्याचे लक्षात आले.

आगीचा अलार्म वाजल्याने पुण्यातील आयसीसी टॉवरमधील कर्मचाऱ्यांची धांदल
पुणे : सेनापती बापट रस्त्यावरील आयसीसी ए विंगमध्ये टॉवरमधील कर्मचाऱ्यांची दुपारी धांदल उडाली. अचानक आगीचा अलार्म वाजल्याने कर्मचारी इमारतीमधून बाहेर आले. मात्र अग्निशामक दलाने तपासणी केल्यानंतर अग्निशामक पॅनलमध्ये दोष असल्याचे लक्षात आले.
सेनापती बापट रस्त्यावरील आयसीसी टॉवरमधील ए विंगमध्ये अचानक आगीचा अलार्म वाजायला लागला. त्यामुळे एकच धावपळ उडाली. सर्वजण जिन्यामधून इमारतीबाहेर आले. अग्निशामक दलास कळविण्यात आले. त्यांच्यामार्फत तातडीने एक गाडी घटनास्थळी पाठविण्यात आली. अग्निशामक दलाने घटनास्थळाची पाहणी, तपासणी केली. मात्र आग लागली नसल्याचे निदर्शनास आले. इंजिनिअरने तपासणी केल्यानंतर नवव्या पॅनलमध्ये बिघाड असल्याचे लक्षात आले. शेवटी साडे तीनच्या दरम्यान आग नसल्याचे अग्निशामक दलाने स्पष्ट केले आणि कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.