अग्निशामक दलाची आठ तास दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 12:42 AM2018-01-16T00:42:24+5:302018-01-16T00:42:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : शहरातील यशवंतनगर भागातील एका जुन्या विहिरीत सोमवारी सकाळी एकाने उडी मारून आत्महत्या केली. झुडपांनी ...

dead body in well; fire brigade efforts for 8 hours | अग्निशामक दलाची आठ तास दमछाक

अग्निशामक दलाची आठ तास दमछाक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरातील यशवंतनगर भागातील एका जुन्या विहिरीत सोमवारी सकाळी एकाने उडी मारून आत्महत्या केली. झुडपांनी वेढलेल्या या विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यासाठी अग्निशमन व पोलीस कर्मचा-यांना तब्बल आठ तास लागले. ज्ञानेश्वर जनार्दन राऊत (४५, रा. यशवंतनगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
पोलीस सूत्रांनी सांगितले, की यशवंतनगर परिसरातील विरळ वस्तीत एक जुनी विहीर आहे. सकाळी आठच्या सुमारास या विहिरीत एका व्यक्तीने उडी घेतल्याचे माहिती नागरिकांनी दिली. माहिती मिळताच तालुका ठाण्याचे बीट जमादार चितळे कर्मचा-यांसह घटनास्थळी पोहोचले. बंद पडलेली ही विहिरी पूर्णपणे झाडाझुडपांनी झाकलेली असल्याने पोलिसांना पाण्यात काहीच दिसले नाही. त्यामुळे नगरपालिकेच्या अग्निशमन दलास बोलावण्यात आले. अग्निशमन दलाचे प्रमुख जाधव यांनी अगोदर विहिरीतील झाडे-झुडपे तोडण्याच्या सूचना जवानांना दिल्या. विहिरीत पाणी असल्यामुळे दोन जवानांनी पाण्यात शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, हाती काहीच लागले नाही. पाण्यात माती पडल्याने आतील काहीच दिसेनासे झाले. त्यामुळे सर्व पाणी उपसण्याचा निर्णय घेतला. यास तीन तास लागले. विहिरीत गणपती मूर्ती विसर्जित केलेल्या असल्याने शोधकार्यात आणखी अडचणी आल्या. पाणी उपसल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी विहिरीत उतरून मृतदेह दोरीच्या सहाय्याने वर काढला. आजूबाजूच्या नागरिकांनी हा शिवणकाम करणा-या ज्ञानेश्वर राऊत यांचा असल्याचे सांगितले. दरम्यान, मृत राऊत यांचे नातेवाइकही घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सामान्य रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी लक्ष्मण अप्पासाहेब मुळे यांच्या माहितीवरून तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस नाईक मुसळे तपास करीत आहेत.

Web Title: dead body in well; fire brigade efforts for 8 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.