शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

एल्गार परिषद प्रकरण : डॅमेज हार्डडिस्कबाबत पुणे पोलीस घेणार अमेरिकेच्या एफबीआयची मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2019 20:01 IST

बंदी असलेल्या माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपावरुन पुणे पोलिसांनी १९ जणांवर संशय व्यक्त

ठळक मुद्देपुण्यातील शनिवारवाडा येथे ३१ डिसेंबर २०१७ मध्ये झाली होती एल्गार परिषद पुणे पोलीस दलातील अधिकारी व फॉरेन्सिक तज्ज्ञ ही हार्ड डिस्क घेऊन लवकरच अमेरिकेला जाणारपोलिसांनी वरवरा राव यांच्या घरी छापा घालून केले साहित्य जप्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचला जात होता, असा निष्कर्ष पुणे पोलिसांनी यापूर्वी ४ वेगवेगळ्या फॉरेन्सिक लॅबची घेतली मदत

पुणे : एल्गार परिषद प्रकरणात जप्त केलेली एक हार्ड डिस्क डॅमेज झाली आहे. त्यातील डाटा परत मिळविण्यासाठी पुणे पोलीस अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) ची मदत घेणार आहे़. यासंबंधीची माहिती पुणे पोलिसांनी न्यायालयाला दिली आहे़. पुणे पोलीस दलातील अधिकारी व फॉरेन्सिक तज्ज्ञ ही हार्ड डिस्क घेऊन लवकरच अमेरिकेला जाणार आहेत. एल्गार परिषदेतील आरोपी वरवरा राव यांच्या घरातून पुणे पोलिसांनी एक हार्ड डिस्क जप्त केली होती. ही हार्ड डिस्क ओपन होत नसल्यामुळे पुणे पोलिसांनी यापूर्वी ४ वेगवेगळ्या फॉरेन्सिक लॅबची मदत घेतली होती. परंतु, यातील माहिती मिळवण्यात त्यांना अपयश आले. त्यामुळे आता ही माहिती मिळवण्यासाठी अमेरिकेच्या एफबीआयची मदत घेण्याचे पोलिसांनी ठरविले आहे. 

पुण्यातील शनिवारवाडा येथे ३१ डिसेंबर २०१७ मध्ये एल्गार परिषद झाली होती. त्यानंतर दुसºया दिवशी कोरेगाव भीमा येथे दंगल झाली होती. या परिषदेत भडकाऊ भाषणे झाल्यावरुन विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास करीत असताना बंदी असलेल्या माओवादी संघटनेकडून या परिषदेसाठी निधी पुरविल्याची माहिती समोर आली होती. त्यावरुन बंदी असलेल्या माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपावरुन पुणे पोलिसांनी १९ जणांवर संशय व्यक्त केला. देशभरातील त्यांच्या घरावर छापे घालून काही कागदपत्रे, हार्ड डिक्स, पेनड्राईव्ह असे साहित्य जप्त केले आहे. पोलिसांनी हैदराबाद येथील प्रसिद्ध कवी, लेखक वरवरा राव यांच्या घरी छापा घालून महत्वाचे साहित्य जप्त केले. त्यत त्यांना एक हार्ड डिस्क मिळाली होती. तसेच आणखी एक हार्ड डिस्क मिळाली होती. या डॅमेज हार्ड डिस्कवरील डेटा मिळविण्यात पुणे पोलिसांना यश आले नाही. त्यामुळे त्यातील डेटा मिळविण्यासाठी आता एफबीआयची मदत ठेवण्याचे पुणे पोलिसांनी ठरविले असून त्याला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. पुणे पोलीस व फॅरेन्सिक तज्ज्ञ ही हार्ड डिस्क घेऊन लवकरच अमेरिकेला जाणार आहेत. ------डेटा मिळविण्यात अपयश बंदी माओवादी संघटनांशी संबंध असलेल्या अनेक संशयीत आरोपींनी आपल्या संगणकावर काही पत्रे लिहिली व नंतर ती डिलिट केली होती. त्यांना ती पत्रे डिलिट केल्यानंतर पुरावा आपण नष्ट केला असा समज झाला होता. पण, हार्ड डिस्कवर त्यावर केलेल्या सर्व कामाचा पुरावा उपलब्ध राहतो, याची माहिती नसल्याने पुणे पोलिसांना या संशयित आरोपींनी मजकुर डिलिट केला असला तरी अनेक बाबींचा खुलासा झाला होता. त्यातूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचला जात होता, असा निष्कर्ष काढला आहे. तसा आरोप या गुन्ह्यातील आरोपींवर केला आहे. मात्र, वरवरा राव यांच्याकडील डॅमेज हार्ड डिस्कवरील डेटा मिळविण्यात अपयश आले आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारArrestअटक