अकरा वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या; लोणी स्टेशन परिसरातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 21:25 IST2021-06-09T21:24:45+5:302021-06-09T21:25:03+5:30
आत्महत्येचे करणं अद्याप अस्पष्ट

अकरा वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या; लोणी स्टेशन परिसरातील घटना
कदमवाकवस्ती : लोणी स्टेशन परिसरातील पठारेवस्ती येथील अकरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि.९) दुपारी एकच्या सुमारास घडली.निकिता लोकेश राठोड (रा. पठारे वस्ती,कदमवाकवस्ती, ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या अल्पवयीन मुलीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकेश राठोड हे गवंडी म्हणून काम करतात. ते नेहमीप्रमाणे बुधवारी (दि.९) दुपारी एकच्या सुमारास जेवायला घरी असता त्यांना निकिता आढळून आली नाही. त्यांनी शेजारील खोलीत जाऊन पहिले तेव्हा ओढणीच्या साहय्याने कपडे अडकविण्याच्या आकडीला अंकिता लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. त्यानंतर तिला नागरिकांच्या मदतीने खाली घेण्यात
आले. तिनेे कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे तिला लोणी काळभोर परिसरातील दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले.
घटनास्थळी पोलीस उपायुक्त नम्रता पाटील,लोणी काळभोरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी,पोलीस निरीक्षक गुन्हे सुभाष काळे,गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोर,उपनिरीक्षक भागवत शेंडगे यांनी भेट देऊन माहिती घेतली.