वडील, अल्पवयीन भाऊ, आजोबा, चुलत मामाचा अकरा वर्षांच्या मुलीवर अत्याचार; पुण्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2022 11:22 IST2022-03-20T11:22:30+5:302022-03-20T11:22:43+5:30
पीडित मुलीचे वडील, भाऊ, आजोबा, चुलत मामा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

वडील, अल्पवयीन भाऊ, आजोबा, चुलत मामाचा अकरा वर्षांच्या मुलीवर अत्याचार; पुण्यातील घटना
पुणे : ताडीवाला रोड येथे राहणाऱ्या अकरा वर्षाच्या मुलीवर तिचे वडील, अल्पवयीन भाऊ, आजोबा, चुलत मामा अशा चौघांनी सातत्याने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बंडगार्डन परिसरातील एका इंग्लिश मीडिअम स्कूलमध्ये केलेल्या समुपदेशनातून हा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी समुपदेशक महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी पीडित मुलीचे वडील, भाऊ, आजोबा, चुलत मामा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अकरा वर्षांची ही मुलगी एका शाळेत शिकत आहे. फिर्यादी समुपदेशक विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यासाठी शाळेत गेल्या होत्या. मुलींना त्या ‘गुड टच, बॅड टच’विषयी समाजावून सांगत होत्या. त्यावेळी या मुलीने आपल्यावर ४ वर्षापासून झालेल्या अत्याचाराची माहिती दिली. ही मुलगी २०१७ मध्ये बिहारमध्ये असताना तिच्या वडिलांनी घरात कोणीही नसताना तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध करण्याचा प्रयत्न केला. नोव्हेंबर २०२० मध्ये ही ताडीवाला रोड येथे असताना तिचा १४ वर्षाच्या मोठ्या भावाने तिच्याबरोबर अनेकदा बळजबरीने शारीरिक संबंध करून धमकी दिली. जानेवारी २०२१ मध्ये तिच्या आजोबांनी तिच्याशी गैरवर्तन केले, तर मे २०२१ मध्ये तिच्या चुलत मामाने तिच्याबरोबर गैरवर्तन केले आहे. बंडगार्डन पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.
गुंडाचा १२ वर्षांच्या मुलीवर बलात्कार
घरी जात असलेल्या १२ वर्षांच्या मुलीला भररस्त्यातून ओढून घरी घेऊन जात तिच्यावर गुंडाने बलात्कार केला. दत्तवाडी पोलिसांनी अस्लम शौकत शेख (रा. जनता वसाहत पुणे) याला अटक केली आहे. अस्लम शेख हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. शेख याने १२ वर्षांच्या मुलीला धमकावून वेळोवेळी जबरदस्तीने शरीरसंबंध केले.