शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

अकरा गाळ्यांतील माल सील

By admin | Updated: March 24, 2017 03:47 IST

नगर परिषद कार्यालय इमारतीतील आठ व नवीन व्यापारी संकुलातील तीन, अशा ११ गाळ्यांमधील माल आच्छादन टाकून

शिरूर : नगर परिषद कार्यालय इमारतीतील आठ व नवीन व्यापारी संकुलातील तीन, अशा ११ गाळ्यांमधील माल आच्छादन टाकून आज भाडे व करथकबाकी प्रकरणी सील लावण्यात आले. नगर परिषद इमारतीतील आठ गाळ्यांची चार वर्षांची सुमारे ५0 लाखांची थकबाकी असल्याने त्यांच्या जंगम मालमत्तेला सील लावल्याचे मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ यांनी सांगितले. ही कारवाई न्यायालयाचा आदर राखून केल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, नगर परिषदेने न्यायालयाचा अवमान केल्याचे गाळेधारकांनी म्हटले आहे.नगर परिषदेत इमारतीत नगर परिषदेच्या मालकीचे व्यापारी गाळे आहेत. यापैकी आठ गाळ्यांना आज मुख्याधिकारी पोळ यांनी पोलीस बंदोबस्तात सील लावले. त्या म्हणाल्या की, २0१२ मध्ये त्रि-सदस्यीय समिनीने व्यापारी गाळ्यांची भाडे निश्चिती केली. यानुसार गाळेधारकांनी भाडे व कर भरणे अपेक्षित होते; मात्र गेल्या चार वर्षांपासून त्यांनी भाडे व कर यानुसार भरला नाही. ५0 लाख रुपयांच्या थकबाकीसाठी नगर परिषदेसाठी गाळेधारकांना वारंवार नोटीस बजावल्या. मात्र, यास प्रतिसाद न मिळाल्याने कारवाई करण्यात आल्याचे मुख्याधिकारी पोळ यांनी सांगितले.त्रि-सदस्यीय समितीने ठरवून दिलेले भाडे आम्हाला मान्य नसून, आम्ही या विरोधात न्यायालयात दावा दाखल केल्याचे गाळेधारकांनी सांगितले.१९९९ मध्ये नगर परिषदेने या गाळेधारकांना गाळे खाली करण्यास सांगितले. (वार्ताहर)