शहरं
Join us  
Trending Stories
1
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
2
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
3
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
4
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
5
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
6
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
7
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
8
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
9
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
10
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
11
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
12
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
13
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
14
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
15
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
16
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
17
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
18
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
19
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!
20
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट

कौतुकास्पद ! रात्रीच्यावेळी सलग दहा तास काम करून ११० गावांचा वीजपुरवठा केला सुरळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2020 16:00 IST

वादळी वाऱ्यासह पावसामुळे ११० गावातील ७ हजार ६०० कुटुंबांचा वीजपुरवठा खंडित

ठळक मुद्देमहावितरणचे अभियंता,कर्मचाऱ्यांची कामगिरी

भोर : तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे वीसगाव चाळीसगाव व हिडोर्शी खोऱ्यातील ११० गावांचा आणि ७ हजार ६०० कुटुंबांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र, देशात कोरोनाची आपत्ती सुरु असताना महावितरणच्या अभियंत्यांनी आणि जनमित्र कर्मचाऱ्यांनी एका रात्रीत १० तास सलग काम करून वीजपुरवठा सुरळीत करुन अंधारात बसलेल्या नागरिकांना दिलासा दिला.   महापारेषणच्या भोर तालुक्यातील १३२/३३ केव्ही कामथडी अतिउच्चदाब उपकेंद्रातुन निघणा-या ३३ केव्ही निरादेवघर या उच्चदाब वीज वाहिनीव्दारे खानापुर, निगुडघर येथील दोन उपकेंद्रांना जलविद्यूत वीज निमिती केंद्रांतंर्गत येणा-या हिडोर्शी वीसगाव खो-यातील ११० गावातील ७६०० वीजग्राहक कुटुंबांना वीज पुरवठा केला जातो.  मंगळवारी कापुरव्होळ, कामथडी कासुर्डी या भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे महावितरणच्या  ३३ केव्ही उच्चदाब निरादेवघर वीज वाहिनी कोसळली. त्यामुळे वीजवाहिच्या बारा गाळयातील तीनपैकी एक वाहिनी जमिनदोस्त झाली. तर चार पीन इन्सुलेटर,२ डिस्क इन्सुलेटर फुटले. यामुळे खानापुर आणी निगुडघर वाहिनीवरील वीजपुरवठा खंडीत झाल्याने दुर्गम डोंगरी भागातील गावे अंधारात गेली.  एकाबाजुला कोरोनाचा थौमान सुरु असताना महावितरणचे सासवड विभागाचे कार्यकारी अभियंता अरविंद वनमोरे आणि भोरचे उपकार्यकारी अधिकारी संतोष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता सचिन कुलकर्णी यांनी ४१ जनमित्रांच्या मदतीने पाहणी करुन सुमारे ६३ किलोमीटर लांबीच्या उच्चदाब वीज वाहिनीच्या पयार्यी वीजपुरवठ्याची सोय नसल्याने तातडीने दुरुस्तीची गरज होती. त्यामुळे जनमित्रांसह ठेकेदार मारुती कंक यांचे १८  कामगार बोलावुन केवळ् बटरी आणि मोबाईलच्या प्रकाशात शेतातील पावसाने झालेल्या चिखलात रात्री ९ वाजता काम सुरु केले. रात्रभर १० तास सलग काम करुन वीजवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पुर्ण केले. यामुळे निरादेवघर जलविद्यूत केद्रांचा वीज पुरवठा पुर्ववत झाला. आणि अंधारातील गावे प्रकाशमान झाली.कोट  महावितरणच्या अभियंता आणि कर्मचारी, ठेकेदाराचे कर्मचारी यांच्या या कामगिरीचे प्रभारी प्रादेशिक संचालक सुनिल पावडे बारामती मंडलचे अधिक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील यांनी कौतुक केले आहे. मोठ्या प्रमाणात पावसाने ६३ कि.मी लांबीच्या उच्चदाब वीजवाहिनी तुटली होती. शेतात सर्वत्र चिखल होता. अंधारात होता त्यामुळे काम करणे अवघड होते.मात्र, शाखा अभियंता जनमित्र आणी ठेकेदाराच्या कामगारांनी केवळ १० तासात न होणारे अवघड काम करुन ११० गावांचा वीजपुरवठा सुरळीत केला.      - संतोष चव्हाण, भोर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता

टॅग्स :PuneपुणेmahavitaranमहावितरणRainपाऊसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसEmployeeकर्मचारी