टाकळीहाजी येथे विहीरीमधे विजेचा करंट उतरला; बाप-लेकाचा दुर्देवी मृत्यू, परिसरामधे हळहळ व्यक्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 21:16 IST2025-09-05T21:16:04+5:302025-09-05T21:16:46+5:30
सकाळी सुदाम गाढवे शेतात मोटार चालू करण्यासाठी गेले असता बराच वेळ होऊन देखील ते आले नाहीत. यामुळे मुलगा भारत हा त्यांना पाहण्यासाठी गेला होता.

टाकळीहाजी येथे विहीरीमधे विजेचा करंट उतरला; बाप-लेकाचा दुर्देवी मृत्यू, परिसरामधे हळहळ व्यक्त
लोकमत न्यूज नेटवर्क
कवठे येमाई : शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. बापलेकाचा विहीरीत विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना तालुक्यातील टाकळी हाजी येथील साबळेवाडी येथे शुक्रवारी (दि.५) सकाळी घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृतांमध्ये सुदाम सुभाष गाढवे (वय ४३) व त्यांचा मुलगा भारत सुदाम गाढवे (वय १७) यांचा समावेश आहे.
सकाळी सुदाम गाढवे शेतात मोटार चालू करण्यासाठी गेले असता बराच वेळ होऊन देखील ते आले नाहीत. यामुळे मुलगा भारत हा त्यांना पाहण्यासाठी गेला. शेतातील विहीरीमध्ये वडिलांना पडल्याचे पाहून मुलगा भारत याने वडिलांना पाण्यातुन बाहेर काढण्यासाठी मित्राला बोलावत विहिरीमधे उडी घेतली. परंतू विहिरीच्या पाण्यात विजेचा जबर करंट असल्याने भारत याचा देखील विजेच्या धक्याने मृत्यू झाला.
भारत गाढवेच्या मित्राने बाजुच्या लोकांना बोलावून विजेचा सप्लाय बंद करून दोघांना पाण्याचे बाहेर काढले. त्यांना वैद्यकीय उपचारासाठी नेले असता दोघांनाही मृत घोषित केले. गाढवे कुटुंब मुळचे अहिल्यानगर जिल्हयातील नांदुर पठार येथील परंतू ते टाकळी हाजी येथे स्थायीक झाले होते.