शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

खराडीमध्ये विद्युत वाहिनीत स्फोट, एक जण गंभीर जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 18:45 IST

खराडीत एसबीआय बिल्डींग समोर पाऊस आल्याकारणाने तेथील शेडच्या बाजूला उभे राहिले असताना महावितरण विद्युत विभागाच्या रस्त्यावरील विद्युत वाहिनीतून स्फोट झाला. 

ठळक मुद्देचंदननगर येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू

पुणे : खराडीत एसबीआय बिल्डींग समोर पाऊस आल्याकारणाने तेथील शेडच्या बाजूला उभे राहिले असताना महावितरण विभागाच्या रस्त्यावरील विद्युत वाहिनीत स्फोट झाला. या स्फोटात इसाक शेख (वय ४०) यांचा डावा हातासह शरीराचा इतरही भाग भाजला आहे.याबाबत चंदननगर पोलीस ठाण्यात महावितरणच्या विरोधात तक्रार नोंदविली आहे. शेख यांच्यावर चंदननगर येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहे.  मे महिन्यात खराडीतील झेन्सार कंपनीसमोर उघड्यावर असणाऱ्या ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाला. अन या स्फोटात दोन तरूण तरूणींचा अभियंताचा होरपळून उपचारा दरम्यान मृत्यू झाला. प्रियका झगडे(वय-२४ रा.सातारा) व मुलगा पंकज खुणे(वय-२५ रा.वर्धा) असे या दोन मृत्यूमुखी पडलेल्या तरूणांची नावे आहेत. ही घटना ताजी असताना पुन्हा  खराडीतील झेन्सार आयटी पार्क पदपथावरील केबलचा स्फोट होऊन तरूणाचा हात भाजला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,शेख हे २० तारखेला गणपती विसर्जन दरम्यान रात्री १ वाजता त्यांच्या मंडळाची मिरवणुक पुढे जात असताना झेन्सार कंपनी समोरील एसबीआय बेल्डींग समोर पाऊस आल्या कारणाने तेथील शेड च्या बाजूला उभे राहीले असताना सदर शेड लगत महावितरण विद्युत विभागाची रस्त्यावरच विद्युत वाहिनीतुन स्फोट झाला. वडगावशेरी परिसरात सातत्याने महावितरण संबंधित आगीच्या घटना घडत आहे. याप्रकरणी महावितरणच्या विद्युत उपअभियंता अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पुणे प्रादेशिक विद्युत निरीक्षण मंडळाकडे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी केली आहे. ....................उघड्यावरील महावितरणच्या स्फोटात डावा हात पूर्णपणे भाजुनही महावितरणचे अधिकारी माझ्यावर पोलिसांत तक्रार दाखल न करण्यासाठी दबाव टाकत होते. अधिकार्यांच्या चुकीमुळच दोन महिन्यांपूर्वी दोघांचा बळी गेला. इसाक महमद शेख,स्फोटातील जखमी......................वडगावशेरी उपविभागीय कार्यालयातील अधिकारी नागरिकांसोबात असभ्य वर्तन करतात. गेल्या पंधरा दिवसांपूर्वीच मनसेच्या वतीने कल्याणीनगर येथील महावितरणाच्या कार्यालयात आम्ही आंदोलन केले होते. सातत्याने अशा घटना घडत असताना महावितरणने गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे.- कल्पेश यादव, शहराध्यक्ष मनविसे 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmahavitaranमहावितरणPoliceपोलिसfireआग