शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
मराठा समाज अन् राज्य सरकारला मोठा दिलासा; 'त्या' GR ला अंतरिम स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार
3
२ तप सत्तेत, २४ वर्षांत काय-काय झाले? नरेंद्र मोदींनी सांगितली CM ते PM प्रवासाची Inside Story...
4
शिंदेंच्या हातून 'धनुष्यबाण' निसटणार?; अंतिम निकाल ठाकरेंच्या बाजूने लागणार, असीम सरोदेंचा दावा
5
जबरदस्त स्वयंपाक घर, भव्य मंदिर, ५०० प्रकारची फळझाडे; कर्नाटकातील शेतकऱ्याने १०० कोटींचे आलिशान घर बांधले
6
"रात्री ३ वाजता उठवलं तरी मी उर्दू बोलतो...", सचिन पिळगावकरांचं नवं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
7
या IPO नं गुंतवणूकदारांवर आणली डोकं झोडून घ्यायची वेळ, दिला तगडा झटका...! ₹129 चा शेअर फक्त 84 पर लिस्ट झाला, पैसे लावणारे 'कोमात'!
8
Video: विठ्ठलाच्या दारातच पुण्यातील भाविकांवर प्राणघातक हल्ला; दगडांनी मारहाण, पंढरपुरातील घटना
9
टीम इंडियातील खेळाडूंना कोच गौतम गंंभीर देणार डिनर पार्टी; पण 'तो' आला तर प्लॅन फिस्कटण्याची भीती
10
एक दिवसाचे दिग्दर्शक झालात तर...; अक्षय कुमारच्या प्रश्नावर CM फडणवीसांचं दमदार उत्तर, टाळ्यांचा कडकडाट
11
जशास तसे उत्तर! जरांगेंचा एल्गार, १९९४ च्या ओबीसी आरक्षणाविरोधात याचिका दाखल करणार
12
योगी बुलडोजर चालवत आहेत तर...? बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकील राकेश किशोर यांचा CJI बीआर गवईंना थेट सवाल
13
कर्ज फेडण्यासाठी अदानी घेणार २,२०० कोटींचं लोन; जगातील ४ मोठ्या बँका करणार मदत, शेअर्समध्ये तेजी
14
मोठी चूक! 'डेलॉइट' कंपनीला AI मुळे कोट्यवधींचा फटका; चुकीच्या रिपोर्टसाठी ऑस्ट्रेलियन सरकारला परत करावे लागणार पैसे
15
बिहारमध्ये भाजपाच्या अडचणी वाढणार, चिराग पासवान-प्रशांत किशोर यांना टाळी देण्याच्या तयारीत?
16
"मला निवडणूक लढवण्याची इच्छा"; मैथिली ठाकूरने सांगितली दोन मतदारसंघांची नावे
17
जखमींना हॉस्पिटलला पोहचवा, २५ हजार ते १ लाख मिळवा; योगी सरकारनं आणली जबरदस्त योजना
18
VIRAL : तो नवरा आहे गं, महिषासुर नाही... करवा चौथची पूजा करण्यासाठी महिलेनं काय केलं, Video बघाच!
19
"आम्हाला दोघांनाही एकमेकांशी लग्न करायचं नव्हतं...", रेणुका शहाणेंचा मोठा खुलासा, म्हणाल्या...
20
Cough Syrup : "पप्पा, घरी जाऊया...", कफ सिरपमुळे मुलीने गमावला जीव; १६ डायलिसिस, २२ दिवस मृत्यूशी झुंज

निवडणुकीची रणधुमाळी! महिलाराज कायम; पुणे जिल्ह्यात ४०% पेक्षा जास्त नगराध्यक्षपदे महिलांसाठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 10:54 IST

भोर नगरपालिकेला १७ वर्षांनंतर सर्वसाधारण आरक्षण मिळाल्याने तेथे मोठी चुरस अपेक्षित आहे, तर ९ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बारामतीला खुल्या वर्गाची संधी मिळाल्याने राजकीय नेत्यांमध्ये उत्साहाची लहर उसळली आहे.

पुणे: राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षण सोडती सोमवारी (दि.६ ऑक्टोबर) मंत्रालयात काढण्यात आल्या. पुणे जिल्ह्यातील १४ नगरपरिषदांपैकी तब्बल ८ च्या पदांचे आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी ठेवण्यात आले असून, चाकण नगरपरिषदेसाठी खुला महिला १, ओबीसी ३ व अनुसूचित जाती (एससी) साठी २ पदे राखीव झाली आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या जानेवारी २०२६ पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याच्या निर्देशानुसार प्रक्रियेला वेग आला असून, मंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत काढण्यात आली. भोर नगरपालिकेला १७ वर्षांनंतर सर्वसाधारण आरक्षण मिळाल्याने तेथे मोठी चुरस अपेक्षित आहे, तर नऊ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बारामतीला खुल्या वर्गाची संधी मिळाल्याने राजकीय नेत्यांमध्ये उत्साहाची लहर उसळली आहे. दुसरीकडे, शिरूर, जुन्नर आणि मंचर येथे ओबीसी महिलांसाठी आरक्षण पडल्याने पुरुष इच्छुकांच्या तयारीवर पाणी पडले असून, महिलाराज कायम राहणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी महिन्याच्या शेवटी आधी निवडणुका घेण्याचे आदेश दिल्याने राज्यभरात आरक्षण प्रक्रिया वेगवान झाली आहे. पुणे विभागात एकूण १४ नगरपरिषदांच्या नगराध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर झाले असून, यामुळे स्थानिक राजकारणात नव्याने समीकरणे आखली जात आहेत. विविध राजकीय पक्षांतून इच्छुक उमेदवारांनी मोर्चेबांधणीस सुरुवात केली असून, भाजप, राष्ट्रवादी (दोन्ही गट), शिवसेना (दोन्ही गट) आणि काँग्रेस यांच्यात ताकदवान उमेदवार उतरवण्याची स्पर्धा रंगणार आहे. विशेषतः भोर नगरपालिकेत माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या भाजप प्रवेशामुळे निवडणूक अधिक रंजक होणार आहे. १७ वर्षांपूर्वी खुल्या वर्गासाठी आरक्षण असलेल्या भोरमध्ये आता दिग्गज नेत्यांची मांदियाळी तयारीला लागली असून, विकासकामे आणि पक्षीय बलस्थाने यावर निकाल अवलंबून असेल.

शिरूर नगरपरिषदेला इतर मागासवर्गीय (ओबीसी) महिलांसाठी आरक्षण पडल्याने सलग तिसऱ्यांदा महिलाराज येणार आहे. येथील स्थानिक राजकारणात महिलांच्या नेतृत्वाने विकासाला गती मिळाली असून, आता नवीन चेहऱ्यांसाठी स्पर्धा तीव्र होईल. इंदापूरमध्ये आठ वर्षांनंतर खुल्या वर्गाची संधी मिळाल्याने उत्साह संचारला आहे. २०१७ च्या निवडणुकीत खुल्या महिलांसाठी असलेल्या या पदावर अंकिता शहा यांनी विजय मिळवला होता. आता कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, हर्षवर्धन पाटील आणि प्रदीप गारटकर यांसारख्या नेत्यांच्या समीकरणांमुळे चुरशीची लढत अपेक्षित आहे. भरणे हे परंपरागत विरोधक असले तरी हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेमुळे राष्ट्रवादीमार्गे भाजपशी संलग्न असलेले गारटकर आणि माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने यांच्याशी जुळवून घेण्याची शक्यता आहे. भाजप गोटातील अंतर्गत रुसवे-फुगव्यांमुळे उमेदवारी कोणाला मिळेल, याची उत्सुकता आहे.जुन्नर नगरपालिकेला ओबीसी महिलांसाठी आरक्षण जाहीर झाल्याने खुल्या गटातील पुरुष इच्छुकांच्या तीन वर्षांच्या मेहनतीवर पाणी पडले आहे. २०१७ च्या निवडणुकीत खुल्या वर्गासाठी असलेल्या या पदावर श्याम पांडे विजयी झाले होते. आता १६३ वर्षे जुनी असलेल्या या नगरपालिकेत भारती देवराम मेहेर, कांचन सुनील मेहेर, शिल्पा विक्रम परदेशी यांसारख्या नावांची चर्चा आहे. ओबीसी मतदार २५ टक्के असल्याने माळी समाजातील उमेदवार गळास लावण्यासाठी पक्ष प्रयत्न करतील. आमदार शरद सोनवणे आणि माजी आमदार अतुल बेनके यांच्यात वर्चस्वाची लढाई होईल, तर मुस्लिम समाजातील उमेदवार रिंगणात असल्याने चुरस वाढेल. नऊ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर बारामती नगरपरिषदेला खुल्या प्रवर्गाचे आरक्षण मिळाले असून, स्थानिक नेत्यांमध्ये उत्साहाची लहर उसळली आहे. इच्छुकांनी जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात केली असून, राष्ट्रवादी-भाजप यांच्यातील टक्कर केंद्रस्थानी राहील.

मंचरला इच्छुकांचा भ्रमनिरास, ओबीसी महिला आरक्षण

मंचर नगरपंचायतीला ओबीसी महिलांसाठी आरक्षण पडल्याने २०२१ मध्ये ग्रामपंचायतीचे रूपांतर झाल्यानंतर पहिल्या नगराध्यक्षपदासाठी जोरदार मोर्चेबांधणी करणाऱ्या इच्छुकांचा भ्रमनिरास झाला आहे. देवदर्शन यात्रा, आरोग्य शिबिरे आणि उत्सव देणग्या यांद्वारे लाखो रुपये खर्चले गेले तरी आता महिलाराज येणार आहे. कुणबी दाखला असणाऱ्यांनी पत्नीला रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू केली असून, मूळ ओबीसी मतदार एकवटण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, माळेगाव अनुसूचित जातींसाठी, तर वडगाव मावळ खुल्या महिलांसाठी राखीव ठरले. एकूण आरक्षणाने पुणे जिल्ह्यातील स्थानिक राजकारणात महिलांसाठी ४० टक्क्यांहून अधिक संधी निर्माण झाल्या असून, विकासवादी उमेदवारांना प्राधान्य मिळेल, अशी अपेक्षा आहे. प्रभागनिहाय आरक्षण लवकर जाहीर होईल, तेव्हा उमेदवारी निश्चित होईल.

खुल्या प्रवर्गातील नगरपरिषद

बारामतीइंदापूरसासवडजेजुरीभोरआळंदीराजगुरूनगरतळेगाव दाभाडे

खुला प्रवर्ग महिला

चाकण

इतर मागासवर्गीय (ओबीसी) महिला

जुन्नर, शिरूर, दौंड

अनुसूचित जाती

लोणावळा, फुरसुंगी-उरुळी देवाची

नगरपंचायतींमधील आरक्षण

माळेगाव- अनुसूचित जाती

मंचर- इतर मागासवर्गीय (ओबीसी) महिला

वडगाव मावळ- खुला प्रवर्ग महिला

English
हिंदी सारांश
Web Title : Pune District Elections: Women Dominate, Over 40% Nagaradhyaksha Posts Reserved

Web Summary : Pune's Nagar Parishad elections see women dominating with over 40% of Nagaradhyaksha posts reserved. New political equations emerge as various parties prepare for a competitive election, especially in places like Bhor and Baramati.
टॅग्स :Puneपुणेnagaradhyakshaनगराध्यक्षElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगElectionनिवडणूक 2024Muncipal Corporationनगर पालिकाWomenमहिलाPoliticsराजकारण