पुणे : कल्याणीनगर भागात ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील चार लाख रुपयांची सोनसाखळी दुचाकीस्वार चोरट्याने हिसकावून नेल्याची घटना घडली. आठवडाभरात कल्याणीनगर भागात महिलेचे दागिने हिसकावण्याची ही दुसरी घटना आहे. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ६७ वर्षीय ज्येष्ठ महिला कल्याणीनगर भागातील एका सोसायटीत राहायला आहेत. त्या शुक्रवारी (दि. ३०) सायंकाळी बाहेर गेल्या होत्या. सायंकाळी पावणे आठच्या सुमारास त्या रिक्षाने कल्याणीनगर परिसरात उतरल्या. रिक्षा चालकाला त्या भाडे देत होत्या. तेवढ्यात पाठीमागून आलेल्या चोरट्याने त्यांना धक्का दिला. ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील चार लाख रुपयांची सोनसाखळी हिसकावून चोरटा पसार झाला. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक अंजूम बागवान यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी सोसायटीच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असून, पसार झालेल्या चाेरट्याचा शोध घेण्यात येत आहे.
आठवड्यापूर्वी कल्याणीनगर भागात पादचारी महिलेचे दागिने दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली होती. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावण्याची घटना घडली. वर्षभरापासून पादचारी महिलांकडील दागिने हिसकावण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दागिने हिसकावणाऱ्या चोरट्यांविरोधात कडक कारवाईचे आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत.
Web Summary : In Kalyani Nagar, Pune, a senior woman was robbed of gold jewelry worth ₹4 lakhs by a thief on a bike. Police are investigating the incident, the second such robbery in the area in a week. Increased patrols and strict action against thieves have been ordered.
Web Summary : पुणे के कल्याणी नगर में एक वरिष्ठ महिला से बाइक सवार चोर ने 4 लाख रुपये के सोने के गहने लूट लिए। पुलिस मामले की जांच कर रही है। एक हफ्ते में यह इस इलाके में दूसरी घटना है। गश्त बढ़ाने और चोरों के खिलाफ सख्त कार्रवाई के आदेश दिए गए हैं।