शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
2
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
5
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
6
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
7
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
8
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
9
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
10
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
11
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
12
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
13
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
14
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
15
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
16
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
17
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
18
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
19
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान
20
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर

वीजरोधक यंत्रणा फोल; वीज अंगावरून ज्येष्ठाचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 3:17 PM

शासनाने त्यासाठी लाखो रुपये खर्च केले मात्र ही यंत्रणा बसवूनही वीज पडण्याचे प्रमाण जास्तच

राजगुरूनगर: चास ता. खेड  येथे आज सायंकाळी ६ च्या सुमारास अंगावर  विज कोसळून राम गंगाराम काळे (वय ७० ) यांचा मृत्यू झाला. चास व परिसराला रविवारी दि ९ रोजी सायंकाळच्या वेळेस मुसळधार पावसाने झोडपून काढले. मुसळधार पावसासह ढगांच्या गडगडाट व विजेच्या कडकडात संध्याकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान जोराचा पाऊस झाला. यावेळी चास येथे राहणारे राम गंगाराम काळे यांच्या अंगावर विज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

 राम काळे यांचे संपूर्ण अंग भाजल्याप्रमाणे काळे पडले असून पाय तर पूर्णपणे काळे पडले होते. या बाबत खेड पोलीसात माहिती दिल्यावर काळे यांचे शरीर शवविच्छेदनासाठी राजगुरूनगर येथे नेण्यात आले. खेड पोलीस पुढील तपास करत आहेत.    चास व परिसरात अनेक गावांमध्ये मागील वर्षी शासनाच्यावतीने लाखो रूपये खर्च करून विज रोधक ( विज अटकाव यंत्र ) यंत्रणा बसविण्यात आली आहे. शासनाने त्यासाठी लाखो रुपये खर्च केले मात्र ही यंत्रणा बसवूनही वीज पडण्याचे प्रमाण जास्त आहे  यंत्रणा बसवूनही विज कोसळून जर नागरिकाचा मृत्यू होत असेल तर या यंत्रणेचा काय फायदा काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्या बाबत निश्चिच चौकशी होणे गरजेचे असल्याची ग्रामस्थ मागणी करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेKhedखेडRainपाऊसelectricityवीजDeathमृत्यू