शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

Coronavirus: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकविरा देवीची यात्रा रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 9:20 AM

सर्व धार्मिक विधी व पूजापाठ परंपरेनुसार होणार

लोणावळा: कोरोना संसर्गच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या कार्ला गडावरील श्री एकविरा देवीची चैत्री यात्रा रद्द करण्याचा निर्णय प्रशासकीय समितीने घेतला आहे. चैत्री यात्राकाळातील देवीचे सर्व धार्मिक विधी व पूजापाठ हे परंपरेनुसार केले जाणार आहेत. मुंबई, पुणे, ठाणे परिसरात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे संसर्ग टाळण्यासाठी, भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून खबरदारीचा उपाय म्हणून जाहीर यात्रा न भरवण्याचा निर्णय श्री एकविरा देवस्थान कार्ला येथील प्रशासकीय समितीने घेतला आहे.वडगाव मावळ येथे प्रशासकिय समितीचे अध्यक्ष व वडगाव मावळ येथील दिवाणी न्यायालयाचे न्यायाधिश, सचिव व मावळचे तहसीलदार व सदस्य सह धर्मदाय आयुक्त यांनी भाविक व वेहेरगाव ग्रामस्त यांच्याशी बैठक घेत हा निर्णय जाहीर केला. तत्पूर्वी वेहेरगाव ग्रामपंचायतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा न भरवण्याचा ठराव मंजूर केला होता.देशासह महाराष्ट्रात सर्वत्र कोरोना विषाणूमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुण्यात संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने येथे आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करत सर्व सार्वजनिक कार्यक्रम, शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली असून नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी तसे आदेश दिले आहेत. एकविरा देवस्थान हे पुणे जिल्ह्यातील वेहेरगाव गावात असून येथे चैत्री यात्रेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भाविक येत असतात. त्यामुळे होणाऱ्या गर्दीतून कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा सर्वाधिक धोका असल्याने भाविकांनी गर्दी करु नये असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान यात्रा काळात तसेच दैनंदिन काळात देवीचे सर्व धार्मिक विधी, पूजापाठ हे परंपरेनुसार केले जाणार आहेत. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आला नसल्याने प्रशासकीय समितीने स्पष्ट केले. 

टॅग्स :corona virusकोरोनाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस