Shivsena | पुण्यात शिंदे-ठाकरे गट आमनेसामने; नेमक काय घडलं, पाहा व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2023 17:08 IST2023-02-18T17:02:02+5:302023-02-18T17:08:40+5:30
पुण्यात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद...

Shivsena | पुण्यात शिंदे-ठाकरे गट आमनेसामने; नेमक काय घडलं, पाहा व्हिडिओ
पुणे : पुण्यात एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट आमनेसामने आले होते. काल निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर राज्यभरात अनेक ठिकाणी दोन्ही गटात वाद झाला आहे. पुण्यात पत्रकार संघासमोर दोन्ही गटांत बाचाबाची झाली. आम्ही फक्त इथं प्रचारासाठी आलो होतो. आम्ही कोणताही वाद घातला नाही, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी दिल्या.
यावर बोलताना शिंदे गटातील कार्यकर्त्ये म्हणाले, कालच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा आम्ही स्वागत करतो. आज जे घडलं तिथं आम्ही सहा ते सात जण होतो. आमच्या पक्षाच्या नेत्यांबद्दल कोणी काहीही बोलले तर आम्ही एवढेच जण त्यांना भारी पडू.