पुणे - काँग्रेसचे माजी सरचिटणीस रोहित टिळक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भरभरून कौतुक करत लवकरच त्यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. एकनाथ शिंदे हे सर्वांना ताकद देणारे आणि सगळ्यांना सोबत घेऊन चालणारे नेते असल्याचे रोहित टिळक यांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदे यांना जेव्हा जेव्हा भेटलो, तेव्हा आमच्यात कधीच राजकीय चर्चा झाली नाही. लोकमान्य टिळक, संस्थेचे काम आणि आजोबा जयंतराव टिळक यांच्याविषयीच आमच्यात अधिक चर्चा व्हायची. “आमच्या पक्षात या किंवा पक्ष फोडाफोडीच्या चर्चा कधीच झाल्या नाहीत,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
एक नेता म्हणून एकनाथ शिंदे आपल्याला भावले असल्याचे सांगताना रोहित टिळक म्हणाले, शिंदे हे सर्वांना बळ देणारे आणि सर्वांमध्ये मिसळून राहणारे नेते आहेत. त्यांच्याशी बोलताना आपण उपमुख्यमंत्री किंवा माजी मुख्यमंत्री यांच्याशी बोलत आहोत, असे कधीच वाटत नाही. सामान्य कार्यकर्त्यांशी सहज संवाद साधणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे आणि लोकही हे मान्य करतात. त्यामुळे अशा नेत्याबरोबर काम करण्याची इच्छा असल्यामुळे आपण शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, अलीकडील राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून रोहित टिळक यांच्या नावाची चर्चा होती. मात्र महाविकास आघाडीच्या बाजूने शरद पवार यांचे नाव पुढे आल्याने आपण राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतल्याचेही रोहित टिळक यांनी स्पष्ट केले.
रोहित टिळक हे मागील तीन वर्षांपासून काँग्रेसपासून काहीसे अलिप्त होते. टिळक स्मारक ट्रस्टकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यात आल्यानंतर काँग्रेसने आपल्याला दूर ठेवले, असा आरोपही त्यांनी केला. या घडामोडींमुळेच आपण शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्याचे रोहित टिळक यांनी सांगितले.
Web Summary : Rohit Tilak lauded Eknath Shinde's leadership, emphasizing his inclusive nature. He clarified that discussions with Shinde focused on Lokmanya Tilak and social work, not political maneuvers. Tilak, feeling sidelined by Congress, decided to join Shiv Sena.
Web Summary : रोहित तिलक ने एकनाथ शिंदे के नेतृत्व की सराहना की और उनकी समावेशी प्रकृति पर जोर दिया। उन्होंने स्पष्ट किया कि शिंदे के साथ चर्चा लोकमान्य तिलक और सामाजिक कार्यों पर केंद्रित थी, न कि राजनीतिक युक्तियों पर। कांग्रेस द्वारा दरकिनार महसूस करने पर तिलक ने शिवसेना में शामिल होने का फैसला किया।