शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

नाथाभाऊ आमचे नेते, त्यांनी तिकडं गेल्यावर तरी खरं बोलावं: चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 15:46 IST

भाजपमध्ये कोणत्याही प्रकारची अस्वस्थता नाही..!

पुणे: काही महिन्यांपूर्वी भाजपला रामराम ठोकत एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. पण त्याआधी आणि राष्ट्रवादी प्रवेशानंतर संधी मिळेल तेव्हा खडसे यांच्याकडून भाजपच्या नेत्यांवर टीकास्र सोडणे सुरूच आहे. आताही त्यांनी भाजपमध्ये अस्वस्थता असल्याचे मत व्यक्त केले होते. मात्र,भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांना 'नाथाभाऊ आमचे नेते, त्यांनी तिकडे गेल्यावर तरी खरं बोलावं' अशा शब्दात जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

पुण्यात एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत होते. यववेली त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. पाटील म्हणाले, भाजपमध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत आणि असतील तरी ते सोडवण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. तसेच आमच्याकडे पक्ष सोडल्यावर मारण्याची पद्धत नाही. जो पक्ष सोडून जातो त्याने जाईल तिथे सुखी रहा, अशी आमची पद्धत आहे. तसेच आम्हाला फसवलं गेलं याचं आम्हाला दु:खं आहे. आमच्याशी धोका झाला. पण दीड वर्षात त्यांनी एकही आंदोलन केलं नाही. आम्ही अनेक आंदोलने केली. पंढरपूरही जिंकलो. मात्र, भाजपमध्ये कोणत्याही प्रकारची अस्वस्थता नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

आघाडी सरकारमध्ये प्रत्येकाला प्रेसमध्ये येेेण्याची घाई 

आघाडी सरकारमध्ये कोणत्याही गोष्टीवर एकवाक्यता नाही. आणि प्रत्येकाला प्रेस समोर येण्याची घाई झाली आहे असे म्हणत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये एकवाक्यता नाही अशी टीकाही केली.

संजय राऊत यांनी ८० नव्हे २८० जागा लढवाव्यात..

संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वीच ८० जागा लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. पण त्यांनी ८० नव्हे २८० जागा लढवाव्यात. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, अशा शब्दात चंद्रकांत पाटलांनी शिवसेना नेते राऊत यांना त्यांनी काढला.शिवसेना नेते संजय राऊत यांनाही टोला लगावला. राऊत यांचं नाव घेऊन तुम्ही माझा दिवस का बिघडवता आहात ? असा प्रश्न देखील पाटील यांनी उपस्थित केला.  

काँग्रेसच्या इंधन दरवाढ विरुद्ध आंदोलनावर टीका...  उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांना प्रत्येक गोष्ट केंद्राने करावी असे वाटत असते. मात्र, राज्याने आधी १० रुपये इंधनावरचा कर कमी करावा, मग केंद्राकडे ५ रुपये कर कमी करण्याची मागणी करावी असे मत व्यक्त करतानाच काँग्रेसच्या इंधन दरवाढ विरुद्ध आंदोलनावर टीका केली.

टॅग्स :Puneपुणेeknath khadseएकनाथ खडसेchandrakant patilचंद्रकांत पाटीलPoliticsराजकारणBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस