मेंढ्यांच्या कळपावर वीज पडून आठ गाभण मेंढ्यांचा मृत्यू; पिंपरी- चिंचवडमधील देहूगावातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 22:04 IST2021-05-30T22:00:50+5:302021-05-30T22:04:59+5:30
ही घटना सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या मध्ये सुमारे 2 लाख रूपयांचे नुकसान आहे.

मेंढ्यांच्या कळपावर वीज पडून आठ गाभण मेंढ्यांचा मृत्यू; पिंपरी- चिंचवडमधील देहूगावातील घटना
देहूगावः पिंपरी चिंचवडमधील देहूगावातील सांगुर्डी येथे आज झालेल्या विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसात अमृता कर्हे यांच्या मेंढ्यांच्या कळपावर वीज पडून आठ गाभण मेंढ्यांचा मृत्यू झाला असुन पंधरा ते सोळा मेंढ्या जखमी झाल्या आहेत. ही घटना सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या मध्ये सुमारे 2 लाख रूपयांचे नुकसान आहे.
ही घटना कळताच सांगुर्डी गावचे पोलीस पाटील सोनम काळे, सरपंच वसंत भसे, कृष्णा भसे, नारायण मराठे, संतोष भोसले, सुदाम भसे,गोविंद भसे,गणेश भसे यांनी अमृता कर्हे यांच्या वाड्यावर जाऊन पाहणी केली व अमृता कर्हे यांना धीर दिला आहे. सरपंच भसे यांनी संबंधित कर्हे यांच्या मृत मेंढ्यांचा पंचनामा करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.