शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
3
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
4
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
5
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
6
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
7
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
8
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
9
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
10
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
11
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
12
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
13
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
14
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
15
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
16
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
17
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
18
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
20
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात

आगामी काळात परिणामकारक हवामान अंदाजावर राहणार भर : डॉ. माधवन नायर राजीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 4:07 PM

हवामान विभागाला आवश्यक ती अत्याधुनिक सामुग्री दिली जात असून या विभागाच्या हवामान अंदाजात सुधारणा होत आहे़.

ठळक मुद्देसाऊथ एशियन आऊटलुक फोरमचे उद्घाटनदेशातील निम्म्या शेतकऱ्यांपर्यत पोहचणार कृषी सल्लाडाटा सर्व्हिसवर जीएसटीने सचिवही अवाक

पुणे : हवामान विभागाकडून हवामानाचा अंदाज दिला जातो़ पण, या अंदाजाचा नेमका काय परिणाम होणार आहे, त्याचा उल्लेख नसतो़. यापुढील काळात हवामानाच्या अंदाजावर नेमका काय परिणाम होऊ शकेल, याचा समावेश त्यात असणार आहे, असे अर्थ सायन्स मंत्रालयाचे सचिव डॉ़. माधवन नायर राजीवन यांनी सांगितले़. इंडिया मेट्रॉलॉजीकल विभागात आजपासून सुरु झालेल्या साऊथ एशियन क्लायमेट आऊटलुक फोरमची दोन दिवसांच्या परिषदेचे उद्घाटन डॉ़. राजीवन यांच्या हस्ते झाले़. यावेळी ते बोलत होते़. या परिषदेत भारतासह बांगला देश, म्यानमार, श्रीलंका या देशाचे हवामान शास्त्रज्ञ सहभागी झाले आहेत़. डॉ़ राजीवन म्हणाले, हवामान विभागाकडून मान्सूनचा अंदाज जाहीर केला जातो़. त्याच्या अगोदर काही खासगी संस्थांकडून अंदाज जाहीर केला जात असला तरी त्यांना थांबविण्याचे कोणतेही धोरण नाही़. हवामान विभागाला आवश्यक ती अत्याधुनिक सामुग्री दिली जात असून या विभागाच्या हवामान अंदाजात सुधारणा होत आहे़.

देशातील निम्म्या शेतकऱ्यांपर्यत पोहचणार कृषी सल्लाहवामान विभाग आणि कृषी हवामान केंद्राच्या सहाय्याने देशभरातील शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या मार्फत २ कोटी लोकांना कृषी हवामानाविषयी एसएमएस पाठविण्यात येतात़.आता हवामान विभाग प्रत्येक जिल्ह्यात कृषी हवामान केंद्र तयार करणार असून प्रत्येक ठिकाणी २ शास्त्रज्ञ आणि एक सहायक नेमणार आहे़ .त्यांना सर्व सामुग्री देण्यात येईल़.त्यातून मिळणाºया माहितीच्या आधारे कृषी पोर्टल तयार करण्यात येणार आहे़. देशभरातील सर्व राज्य शासनांकडून शेतकऱ्यांचे मोबाईल मागविण्यात येत आहेत़. त्यानंतर हवामान विभाग स्वत:ची एसएमएस सेवा सुरु करणार आहे़.देशातील निम्म्या शेतकऱ्यांपर्यंत त्यांच्या प्रादेशिक भाषेत पोचविली जाणार असून त्यांची सुरुवात येत्या जूनपासून करण्यात येणार आहे़.हवामानाचा दीर्घकालीन अंदाज व्यक्त करणाऱ्या जगाच्या नकाशात भारतातील कोणतही संस्था सध्या दिसत नाही, याविषयी त्यांनी खंत व्यक्त करुन येत्या काही वर्षात त्या दिसू शकतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली़. महासंचालक डॉ़ के़ जे़ रमेश यांनी सांगितले की, भारतीय हवामान विभागाकडून प्रसारित हवामान अंदाजाचा सार्क देशांना चांगला फायदा होत आहे़. श्रीलंका, भूतान तसेच गल्फमधील देशांनी अशाप्रकारे त्यांच्या देशासाठी आवश्यक प्रॉडक्ट तयार करुन देण्याची विनंती केली आहे़. सार्क आपत्ती व्यवस्थापन सेंटरचे संचालक डॉ़. पी़. के़. तनेजा म्हणाले, दक्षिण एशियन देशांमध्ये हवामानातील बदलांमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे़. त्यावरील उपाययोजनांसाठी एकमेकांच्या सहकार्याची आवश्यकता आहे़. डाटा सर्व्हिसवर जीएसटीने सचिवही अवाकहवामान विभागामार्फत विविध प्रकारच्या सेवा पुरविण्यात येतात़. त्यासाठी पैसेही आकारण्यात येतात़, याची माहिती डॉ़ राजीवन हे देत होते़. त्यात त्यांना त्यावर जीएसटीही लागू असल्याचे पाहून ते अवाक झाले़. ते म्हणाले, व्यावसायिक गरज म्हणून मागितल्या जाणाऱ्या माहितीवर शुल्क योग्य आहे़. विद्यार्थी आणि विद्यापीठांना सर्व प्रकारची माहिती तातडीने आणि मोफत उपलब्ध करुन दिली पाहिजे़.  

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीagricultureशेती