शहरं
Join us  
Trending Stories
1
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
2
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
3
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
4
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
5
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
6
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
7
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
8
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
9
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
10
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
11
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
12
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
13
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक
14
Viral Video: भल्यामोठ्या अजगराला दुचाकीला बांधून फरफटत नेलं, संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड!
15
वानखेडे स्टेडियममध्ये सुनील गावसकर, शरद पवार यांचा होणार गौरव, MCA उभारणार पुतळा
16
जुहूच्या समुद्रात दोन अल्पवयीन मुले बुडाली; एकाला वाचवलं, दुसऱ्याचा शोध सुरू!
17
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
18
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
19
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
20
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद

उन्हाचा चटका '' पीएमपी '' लाही 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2019 20:00 IST

काही दिवसांपासून शहरातील तापमानाचा पारा चाळिशीच्या पुढे गेला आहे. तीन-चार दिवसांत ४२ ते ४३ अंशपर्यंत पारा गेल्याने मागील शंभर वर्षातील उच्चांक गाठला आहे.

ठळक मुद्देरविवारी पीएमपीच्या मालकीच्या ७४ तर भाडेतत्वावरील ८६ बस मार्गावर पडल्या बंद

पुणे : उन्हाच्या असह्य चटक्यांनी पुणेकरांच्या अंगाची काहिली होत असताना पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)च्या बसलाही उन्हाचा चटका बसू लागला आहे. उन्हाची तीव्रता वाढू लागताच मार्गावर बस बंद पडण्याचे प्रमाणही वाढले आहे. रविवारी मार्गावरील सुमारे १४०० बसपैकी १६० बसचे ब्रेकडाऊन झाले. काही दिवसांपुर्वी हे प्रमाण १४५ ते १५० पर्यंत होते. काही दिवसांपासून शहरातील तापमानाचा पारा चाळिशीच्या पुढे गेला आहे. तीन-चार दिवसांत ४२ ते ४३ अंशपर्यंत पारा गेल्याने मागील शंभर वर्षातील उच्चांक गाठला आहे. त्यामुळे पुणेकरांना उन्हाच्या झळा असह्य होऊ लागल्या आहेत. उन्हातून चालणे किंवा दुचाकीवरून जाण्याचेही अनेक जण टाळत आहेत. त्यामुळे दुपारच्या वेळी नेहमी वर्दळ असलेल्या रस्त्यांवरील गर्दी कमी झाली आहे. या उन्हाच्या चटक्याचा फटका पीएमपीच्या बससेवेलाही बसू लागला आहे. काही दिवसांपर्यंत इंजिनमध्ये बिघाड, वायरिंगचे शॉर्टसर्किट, टायर पंक्चर यांसह विविध तांत्रिक कारणांमुळे दररोज सरासरी १५० बस बंद पडत होत्या. आता उन्हाच्या तीव्रतेमुळे ब्रेकडाऊनचे प्रमाण वाढू लागले आहे. रविवारी पीएमपीच्या मालकीच्या ७४ तर भाडेतत्वावरील ८६ बस मार्गावर बंद पडल्या. मागील आठवड्यात बसची संख्या कमी होती. तुलनेने हे प्रमाण ८ ते १० बसने वाढल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. उन्हामुळे इंजिन गरम होऊन बिघाड होण्याचे प्रमाण अधिक आहे. तसेच काहीवेळा टायर पंक्चरच्याही तक्रारी आहेत. उन्हाची तीव्रता कायम राहिल्यास ब्रेकडाऊन आणखी वाढू शकते. पण सध्यातरी हे प्रमाण नियंत्रणात असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.----------ब्रेकडाऊनची सरासरीफेब्रुवारी - १५६मार्च - १५२दि. २८ एप्रिल - १६०-----------ताफ्यातील एकुण बस - १९७४मालकीच्या - १३५० ते १४००प्रत्यक्ष मार्गावर - १००० ते १०५०भाडेतत्वावरील - ६०२प्रत्यक्ष मार्गावर - ४२५ ते ४५०

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलSummer Specialसमर स्पेशल