शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

इर्शाळवाडी दुर्घटनेत पालक गमावलेल्या मुलांचे शैक्षणिक पालकत्व अन् वैद्यकीय मदत, पुण्यातील भोई प्रतिष्ठानची साथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 16:29 IST

शनिवारी भोई प्रतिष्ठानच्या वतीने वैद्यकीय पथक रवाना होत असून दुर्घटनेत पालक गमावलेल्या मुलांचे शैक्षणिक पालकत्व ही घेण्यात येणार आहे.

पुणे: रायडमधील इर्शाळवाडी इथं दरड कोसळल्याने अख्खं गाव जमीनदोस्त झाले. याठिकाणी ढिगाऱ्याखाली बरेच लोक गाडले गेले. बुधवारी मध्यरात्रीपासून इर्शाळवाडीत शोधमोहिम सुरू आहे. NDRF पथके आणि इतर स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने इथे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. आतापर्यंत या दुर्घटनेत २१ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या दुर्घटनेतील जखमींवर नवी मुंबई इथं उपचार करण्यात येत आहेत. घटनास्थळी पोहचण्यासाठी कुठलीही सोय नसल्याने तासभर पायपीट करावी लागते. याठिकाणी जवळपास १०-१५ फूट मातीचा थर असल्याने बचाव पथकाला अडथळे येत आहेत. अशातच पुण्यातील भोई प्रतिष्ठानने महत्वाचा निर्णय घेतला आहे.  दुर्घटनेत पालक गमावलेल्या मुलांचे शैक्षणिक पालकत्व भोई प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात येणार आहे. तसेच वैद्यकीय पथक रवाना होणार असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ मिलिंद भोई यांनी सांगितले आहे. 

इर्शाळवाडी रायगड येथील दरडग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी पुण्यातील भोई प्रतिष्ठानचे वैद्यकीय मदत पथक रवाना होत असुन यासंबंधी स्थानिक पोलीस प्रशासनाशी सुद्धा संपर्क साधण्यात आला आहे. त्यांच्या समन्वयातून हे मदत कार्य संपन्न होणार आहे. वैद्यकीय मदती सोबतच या बांधवांना भावनिक व मानसिक आधार देण्याच्या दृष्टीने विविध प्रकल्प येथून पुढे राबविण्यात येणार आहे. या दुर्घटनेत पालक गमावलेल्या मुलांचे शैक्षणिक पालकत्व भोई प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात येणार असल्याचे भोई यांनी सांगितले.  शनिवार 22 जुलैला डॉ.मिलिंद भोई यांच्या नेतृत्वात हे पथक रवाना होत असल्याचे ते यावेळी म्हणाले आहेत. 

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला लोकांचा प्रतिसाद

ही दुर्घटना घडल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी पोहचले होते. सकाळपासून त्यांनी याठिकाणी आढावा घेतला. तासभर पायपीट करत स्वत: दुर्घटनास्थळी पोहचले. तिथल्या पीडित कुटुंबांची विचारपूस केली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकांना मदतीचे आवाहन केले होते. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थांबरोबरच मदतकार्यासाठी तैनात मनुष्यबळासाठी अन्नाची पाकिटे, चादरी-ब्लॅंकेटस, तात्पुरते निवारे, कंटेनर, पाण्याच्या बाटल्या, टॉर्च, बिस्किटे तसेच प्रथमोपचार साहित्य आदी मदत साहित्याचा ओघ सुरु झाला आहे. 

टॅग्स :PuneपुणेRaigadरायगडRainपाऊसenvironmentपर्यावरणNatureनिसर्गdoctorडॉक्टर