शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
4
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
5
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
6
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
7
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
8
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
9
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
10
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
11
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
12
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
13
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
14
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
15
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
16
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
17
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
18
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
19
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
20
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?

ईडी, सी बी आय, कुठलीही नोटीस आली नाही; वळसे पाटलांनी सांगितलं सत्तेत जाण्याचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2023 15:58 IST

शरद पवार देशातील उत्तुंग नेता असताना महाराष्ट्रातील जनतेने एकदा सुद्धा पवारांच्या ताकदीवर राज्य आणून दिले नाही

मंचर (पुणे) : डिंभे धरणाचे पाणी बोगदा करून पलीकडे नेले जाणार आहे. धरणाच्या तळात बोगदा करण्याचा निर्णय झाला आहे. घोडनदीवरील 65 बंधाऱ्यांना धरणातून पाणी सोडले जाणार नाही. परिणामी या भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण होणार आहे. या ज्वलंत प्रश्नासाठी सत्तेत गेलो आहे. मला ईडी,सी बी आय, इन्कम टॅक्सची कुठलीही नोटीस आलेली नाही. असे स्पष्ट मत दिलीप वळसे पाटलांनी व्यक्त केले आहे. 

समाजासाठीच हा निर्णय घेतला आहे. शेवटच्या श्वासापर्यंत तालुक्यातील जनतेला कमी पडू देणार नाही व अंतरही देणार नाही. असही ते यावेळी म्हणाले आहेत. मंचर येथील शिवगिरी मंगल कार्यालयात आज वळसे पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा पार पडला. मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल वळसे पाटील यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी बोलताना त्यांनी राज्यातील चालू घडामोडी बाबत भाष्य केले. 

वळसे पाटील म्हणाले,  शरद पवार देशातील उत्तुंग नेता असताना महाराष्ट्रातील जनतेने एकदा सुद्धा पवारांच्या ताकदीवर राज्य आणून दिले नाही. आघाडीचे सरकार आले. राष्ट्रवादीचे सरकार आले पाहिजे त्यातून हा निर्णय झाला. काय निर्णय घ्यायचा हा पेच माझ्यापुढे होता. त्यावेळी डिंभे धरणाचे पाणी बोगदा करून पलीकडे नेण्याचा निर्णय झाला. पाणी ही वैयक्तिक मालकी नाही. मात्र सुरुवातीला 712 मीटरवर बोगदा घेण्याचे ठरले होते. आघाडी सरकार गेल्यानंतर सदरचा बोगदा धरणाच्या तळात काढण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत घेतला. बोगदा व्हायचा तेव्हा होईल मध्यंतरी सरकारने आंबेगाव, जुन्नर, शिरूर, पारनेर तालुक्यातील 65 कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात धरणातून पाणी न सोडण्याचा निर्णय घेतला. या परिसरात पाच साखर कारखाने आहेत. उसामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती चांगली झाली आहे. दुष्काळी भाग बागायती झाला आहे. शेतकऱ्यांचे जीवन सुखी झाले आहे. 

टॅग्स :PuneपुणेambegaonआंबेगावNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षSharad Pawarशरद पवार