शहरं
Join us  
Trending Stories
1
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
2
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
3
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
4
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
5
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
6
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
7
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
8
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
9
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
10
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
11
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
12
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
13
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
14
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
15
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
16
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
17
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
18
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
19
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
20
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
Daily Top 2Weekly Top 5

‘पर्यावरण समृद्ध ग्राम’ योजनेला खीळ!

By admin | Updated: June 4, 2015 22:50 IST

महत्त्वाकांक्षी ‘पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना’ भाजप सरकारच्या राजकीय हव्यासापोटी बंद पडण्याच्या मार्गावर आहे.

बापू बैलकर/ सुषमा नेहरकर-शिंदे ल्ल पुणेपर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण करून समृद्ध गावांची निर्मिती करण्यासाठी सुरु करण्यात आलेली महत्त्वाकांक्षी ‘पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना’ भाजप सरकारच्या राजकीय हव्यासापोटी बंद पडण्याच्या मार्गावर आहे. गेल्या पाच वर्षांपासून सुरु असलेली ही योजना बंद करुन नवीन योजना आणण्याचा भाजप सरकारचा घाट आहे. शासनाने या योजनेला चालू आर्थिक वर्षांत निधीच दिलेला नाही. ‘इको व्हिलेज’ऐवजी ‘स्मार्ट व्हिलेज’ अशी सुधारित योजना आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या कालावधीत ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी ग्रामीण भागासाठी ही योजना सुरु केली. सन २००९-१० मध्ये पुणे जिल्ह्यात या योजनेची सुरुवात झाली. पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण करुन समृद्ध गावाची निर्मिती हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. यात गावामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात वृक्ष लागवड करणे, घन कचरा व्यवस्थापन, शंभर टक्के कर वसुली, प्रत्येक कुटुंबाला स्वच्छतागृह, बायोगॅस प्रकल्प, सौर ऊर्जा निर्मिती अशा अनेक उपाययोजना करण्यात आल्या. पुणे जिल्ह्यात पहिल्या वर्षी ९५० ग्रामपंचायतींची योजनेसाठी निवड करण्यात आली होती. निवड झालेल्या गावांना विविध विकासकामे करण्यासाठी तब्बल ३० कोटी ९३ लाखांचा निधी मिळाला होता. त्यानंतर दुसऱ्या वर्षी ५२९ गावांंसाठी १६ कोटी ९५ लाख, तिसऱ्या वर्षी ६२६ गावांना १९ कोटी ७० लाखांचा निधी, चौथ्या वर्षांत ३५३ गावांसाठी ११ कोटी ५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. चालू वर्षी पर्यावरण संतुलित समृद्ध ग्रामसाठी जिल्ह्यात सुमारे २९७ गावांचे प्रस्ताव आले आहेत. परंतु, या गावांचे पुढे काय करायचे याबाबत शासनाकडून कोणत्याही मागर्दशक सूचना आलेल्या नाहीत. तसेच आवश्यक असलेला निधी देखील शासनाने दिलेला नाही. नवीन सरकार या योजनेला सुधारीत योजना करता येईल का, याची चाचपणी करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले. या संदर्भात पर्यावरण समृद्ध ग्राम योजनेचे काम पाहणारे मंत्रालयातील कक्ष अधिकारी सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता, या योजनेची तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. आता नव्याने निकष बदलून या योजनेची पुनर्बांधणी करण्याचा विचार असून यासाठी एक समिती नेमल्याचे सांगितले. पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेचा आढावा घेण्यासाठी सरकारने राजीव गांधी पंचायती सशक्तीकरण अभियानाचे राज्याचे संचालक डी. डी. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक समितीही नेमली आहे. या समितीची एक बैठक झाली आहे. याबाबत शिंदे म्हणाले, ‘‘ आम्ही फक्त या योजनेचा आढावा घेत आहोत. आमची एक प्राथमिक बैठक झाली आहे. यात फक्त चर्चा झाली असून अजून कामाची दिशा ठरलेली नाही. यातून सरकार काही नवीन योजना करणार आहे का, हे माहित नाही.’’निधी न मिळाल्याने ग्रामपंचायतींची अडचण४‘पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजने’साठीचा २०१२ नंतर सरकारने निधी दिला नाही. त्यामुळे या योजनेंतर्गत कामे करून निधी रखडल्याने ग्रामपंचायतींची मोठी अडचण झाली आहे. ४२०११-१२ साठी ६३७ ग्रमापंचायतींसाठी आवश्यक १,१७० लाख निधीपैकी १,४४५ लाखांचा निधी प्राप्त झाला असून ५२५ लाखांचा निधी अद्याप मिळाला नाही.४२०१२-१३ साठी ३५३ ग्रामपंचायतींसाठी १,१०५ लाखांचा आवश्यक निधीही आतापर्यंत मिळालाच नाही. प्रस्ताव दाखल केल्याने ग्रामपंचायतींनी यातील बरीचशी कामे करून घेतली आहेत. मात्र, निधीच आला नाही. त्यामुळे त्या अडचणीत सापडल्या आहेत.