शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
5
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
6
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
8
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
9
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
10
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
11
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
12
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
13
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
14
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
15
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
16
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
17
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
18
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
19
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
20
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!

वीजनिर्मितीमधून दीड लाख कमावले, पर्यावरणप्रेमी कॅमेलिया अपार्टमेंटचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 03:05 IST

पाषाण-बाणेर लिंक रोडवरील कॅमेलिया अपार्टमेंट मधील रहिवाशांनी सुरू केले आहेत. त्यामुळे त्यांनी इतर सोसायटींसमोर एक आदर्श ठेवला आहे. विजेची निर्मिती करून सहा महिन्यांत तब्बल दीड लाख रुपयांची वीज विक्री अपार्टमेंटतर्फे करण्यात आली आहे.

पुणे : पावसाचे पडणारे पाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग करून जमिनीत जिरवले जाते, सोसायटीमधील कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन केल्याने तो कचरा सोसायटीमध्ये जिरविला जातो, विजेची बचत व्हावी म्हणून सौरऊर्जेचा वापर करण्यात येतो. पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी वृक्षारोपणाचा वसा त्यांनी घेतला आहे. हे सर्व उपक्रम पाषाण-बाणेर लिंक रोडवरील कॅमेलिया अपार्टमेंट मधील रहिवाशांनी सुरू केले आहेत. त्यामुळे त्यांनी इतर सोसायटींसमोर एक आदर्श ठेवला आहे. विजेची निर्मिती करून सहा महिन्यांत तब्बल दीड लाख रुपयांची वीज विक्री अपार्टमेंटतर्फे करण्यात आली आहे.पाषाण - बाणेर लिंक रोडवरील कॅमेलिया अपार्टमेंट ही सोसायटी बाणेर-पाषाणच्या टेकडीच्या पायथ्याशी आहे. या अपार्टमेंटमध्ये जवळपास १५० कुटुंबे वास्तव्याला आहेत. यामध्ये जवळपास सर्वच लोक उच्चशिक्षितआणि उच्चपदस्थ आहेत. त्यामुळेच त्यांनी सोसायटीमध्ये सामाजिक उपक्रम राबविले आहेत.साधारण: २००७-०८ मध्ये येथे रहिवासी येण्यास सुरुवात झाली. त्यानंतर येथील रहिवाशांनी एकत्र येऊन सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी चांगले उपक्रम राबविण्याचा निर्धार केला. त्यानूसार रेनवॉटर हार्वेस्टिंग, घनकचरा व्यवस्थापन, सेंद्रिय खत प्रक्रिया, सौरऊर्जानिर्मिती, पाषाण - बाणेर टेकडीवर वृक्षारोपण, रोपवाटिका याप्रकारचे विविध उपक्रम सुरू केले. त्यामुळे इतर सोसायटीधारकही त्यांचा आदर्श जपण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.रेन वॉटर हार्वेस्टिंग : सोसायटीमध्ये हा प्रकल्प २०१६ मध्ये सुरू करण्यात आला. प्रामुख्याने अपार्टमेंटमधील अनावश्यक पाणी जलवाहिनीद्वारे जमिनीत सोडले जाऊ लागले. त्यामुळे भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास मदत होते. त्यामुळे या ठिकाणी ड्रेनेज लाईनच्या पाण्यामुळे इतरांना त्रास होण्याचा प्रकार दिसून येत नाही. या उपक्रमामुळे येथील नागरिकांना पाण्याची टंचाई जाणवत नाही.सौरऊर्जानिर्मिती : या प्रकल्पाची सुरुवात नोव्हेंबर २०१७ मध्ये करण्यात आली. प्राथमिक प्रायोगिक तत्त्वावर ३१ सौर पॅनल या अपार्टमेंटमध्ये बसवण्यात आले आहेत. एका दिवसाला १० किलो वीजनिर्मिती केली जाते. तसेच, यामधून निर्माण होणारी वीज विद्युत वितरण कंपनीला दिली जाते. या बदल्यात आतापर्यंत सहा महिन्यांत जवळपास दीड लाख रुपयांच्या विजेची विक्री केली आहे.घनकचरा व्यवस्थापन : सध्या शहरामध्ये कचºयाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. सर्वच ठिकाणी कचरा गोळा करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून काम केले जाते; परंतु या अपार्टमेंटमध्ये कचरा व्यवस्थापनाची स्वतंत्र यंत्रणा आहे. यामध्ये ओल्या कचºयासाठी वेगळ्या पेट्या तयार करण्यात आल्या आहेत. कचºयावर प्रक्रिया करण्याची प्रक्रिया १५ दिवस चालते. त्यामुळे प्रत्येक दिवसाचा कचरा एका पेटीत टाकला जातो. त्यावर केमिकल्स टाकून त्यापासून सेंद्रिय खताची निर्मिती केली जाते. तसेच, सुका कचरा स्वच्छ संस्थेला देण्यात येतो. त्यावरही प्रक्रिया केली जाते.वृक्षारोपण : या अपार्टमेंटमध्ये प्रवेश करताच एक प्रकारे सर्वांचेच मन मोहून जाईल, असे दृश्य समोर दिसते. कारण, सगळीकडे विविध प्रकारची झाडे पाहावयास मिळतात. तसेच, येथील रहिवासी अनिल लेले यांच्या प्रयत्नातून बाणेर टेकडीवर वृक्षारोपण केले आहे. मागील दोन ते तीन वर्षांत त्यांनी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड केली आहे.रहिवाशांच्या पालिकेकडून अपेक्षाकॅमेलिया अपार्टमेंटमध्ये मुलांना खेळण्यासाठी, तसेच ज्येष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी आजू- बाजूच्या ठिकाणी उद्यानांची व्यवस्था केली जावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. तसेच पाषाण-बानेर लिंक रोडवरील पथदिवे हे जवळपास तीन ते चार महिने बंदच अवस्थेत आहेत. त्यामुळे ते नियमित चालू करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.इतर सोसायटी- धारकांसाठी प्रेरणाया अपार्टमेंटने स्वत:ची कामे स्वत: करून लोकांपुढे एक प्रकारचा आदर्श निर्माण केला आहे. यामध्ये अपार्टमेंटचे तुषार लवलेकर, रवी सिन्हा, भूषण चिखलकर, अनिल लेले, हर्षद मेढेकर, शिरीष बेनगेर यांच्या प्रयत्नातून कॅमेलिया अपार्टमेंट हे पूर्णपणे स्वावलंबी बनले आहे. या अपार्टमेंटने समाजात एक प्रकारे आपला वेगळा ठसा उमटवला आहे आणि अशा प्रकारचे प्रकल्प राबवणे काळाची गरज बनली आहे. त्यामुळे प्रत्येक अपार्टमेंट, सोसायटी, वसाहती सर्वांनी याकडे एक प्रकारची प्रेरणा किंवा संधी म्हणून पाहिले पाहिजे आणि त्या प्रकारचे उपक्रम राबवले पाहिजेत.सामाजिक उपक्रम : यामध्ये गणपती उत्सव, १५ आॅगस्ट, २६ जानेवारी, नवरात्री उत्सव, क्रीडा दिवस अशाप्रकारचे उपक्रम राबवले जातात. 

टॅग्स :Puneपुणेelectricityवीजnewsबातम्या