शहरं
Join us  
Trending Stories
1
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
2
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
3
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
7
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
8
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
9
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
10
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
11
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
12
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
13
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
14
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
15
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
16
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
17
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
18
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
19
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
20
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

वसंत मोरेंच्या 'हातोड्या'बाबत खा. कोल्हेंना विश्वास; 'राशप'मधील प्रवेशाचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2024 21:58 IST

महाविकास आघाडीतील पुणे लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर, आता वसंत मोरे काय भूमिका घेतील, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले होते.

मुंबई/पुणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडल्यानंतर माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे सांगितले. त्यासाठी, महाविकास आघाडीकडून त्यांना उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्नही सुरू होते. विशेष म्हणजे महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची त्यांनी भेट घेऊन चर्चाही केली होती. मात्र, काँग्रेसकडून पुण्यातील उमेदवारी जाहीर झाली असून आमदार रविंद्र धंगेकरांना महाविकास आघाडीने पुणे लोकसभेच्या मैदानात उतरवले आहे. त्यामुळे, वसंत मोरेंची नेमकी भूमिका काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच, खासदार अमोल कोल्हे यांनी आज वसंत मोरेंची भेट घेऊन विश्वास व्यक्त करत वेगळेच संकेत दिले आहेत. 

महाविकास आघाडीतील पुणे लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर, आता वसंत मोरे काय भूमिका घेतील, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले होते. मी एकला चलो रे च्या भूमिकेत असून त्यावर ठाम आहे. त्यामुळे, पुण्यातील निवडणुक मी एकतर्फी होऊ देणार नाही, असे सांगत त्यांनी आपल्या अपक्ष उमेदवारीचा पुर्नउच्चार केला होता. मात्र, आज खासदार अमोल कोल्हे यांनी वसंत मोरेंची भेट घेऊन त्यांच्या हातोड्याचा उल्लेख करत विश्वास व्यक्त केला आहे.  ''जनसंवाद दौऱ्याच्या निमित्ताने आमचे मित्र तथा माजी नगरसेवक वसंत मोरे यांच्या जनता दरबारास सदिच्छा भेट दिली. वसंततात्या मोरे हे धडाडीचे नेते तथा नेहमी सत्याच्या, न्यायाच्या बाजूने उभे राहणारे कार्यकर्ते म्हणून सर्वांना परिचित आहे. वसंततात्यांचा "हातोडा" यावेळी न्यायाच्या बाजूने उभा राहणार हा विश्वास आहे,'' असे अमोल कोल्हेंनी म्हटलं आहे. अमोल कोल्हेंच्या या विधानामुळे वसंत मोरे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत सहभागी होतील, अशी चर्चा जोर धरु लागली आहे. कारण, यापर्वी आमदार निलेश लंकेंबाबत खा. कोल्हेंनी असेच संकेत दिले होते. त्यानंतर, लंकेंनी शऱद पवारांची भेट घेऊन, मी त्यांच्याच विचारांचा माणूस असल्याचे स्पष्ट केले. तर, अहमदनगर मतदारसंघातून त्यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारीही देण्यात येणार असल्याचे समजते. 

दरम्यान, वसंत मोरेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यास बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना मदत होऊ शकते. तर, आगामी विधानसभा निवडणुकांवेळी वसंत मोरेंना संधी दिली जाऊ शकते. मात्र, तुर्तात वसंत मोरेंनी आपली भूमिका जाहीर केली नसून पुणेकरांवर निर्णय सोपवला आहे.

टॅग्स :Dr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेPuneपुणेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४ElectionनिवडणूकNCPराष्ट्रवादी काँग्रेस