जेजुरीजवळ दौंडज खिंडीत पहाटे अपघात; एका तरुण वारकऱ्यांचा मृत्यू, तर तिघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2023 10:34 IST2023-12-03T10:34:10+5:302023-12-03T10:34:19+5:30

या अपघातात एका तरुण वारकऱ्याचा मृत्यू झाला. तर तिघे वारकरी गंभीर जखमी झाले आहेत.

Early morning accident at Daundj pass near Jejuri; One young worker died and three others were injured | जेजुरीजवळ दौंडज खिंडीत पहाटे अपघात; एका तरुण वारकऱ्यांचा मृत्यू, तर तिघे जखमी

जेजुरीजवळ दौंडज खिंडीत पहाटे अपघात; एका तरुण वारकऱ्यांचा मृत्यू, तर तिघे जखमी

जेजुरी- कार्तिकी वारीसाठी  पंढरपूर हून आळंदी कडे श्री पांडुरंग व संत नामदेव महाराज पालखी सोहळा जेजुरी जवळील दौंडज खिंडीतून मार्गस्थ होताना पहाटे साडे चार वाजता या वारीतील चार वारकऱ्यांना पीकअप जीपने  धडक दिली. या अपघातात एका तरुण वारकऱ्याचा मृत्यू झाला. तर तिघे वारकरी गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत जेजुरी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पंढरपूर हून आळंदी कडे वारकरी दिंडी जात होती. पहाटे साडे चार वाजता दौंडज खिंडीत काही वारकरी टँकरच्या नळावर हात पाय धुत असताना मागून आलेल्या पीकअप जीप ने चार वारकऱ्यांना धडक दिली.

या अपघातात  कृष्णा नागोराव गरुड ( वय २३)  रा. मटकर आळा ता. जिल्हा परभणी यांचा जागीच मृत्यू झाला तर सिधेशोर प्रभाकर बोबडे ( वय 23.) रा. बोबडे टाकली ता. जि. परभणी, रितेश राजाराम ब्रम्हे ( वय 18 ) रा. बोबडे टाकली ता. जि. परभणी , चक्रधर कोपलवर ( वय 28 ) रा. साडेगाव ता. जि. परभणी हे तिघे जखमी झाले आहेत. या जखमी रुग्णांना उपचारासाठी ससून रुग्णालय पुणे येथे दाखल केले आहे. पीकअप चालक निलेश बाळासाहेब जगताप ( वय ३५ ) रा.कोथळे, ता. पुरंदर यास पिकअप क्र. एम एच १४ जियु ५०४५ सह पोलिसांनी अटक केली असून जेजुरी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर या प्रकरणी तपास करीत आहेत.

Web Title: Early morning accident at Daundj pass near Jejuri; One young worker died and three others were injured

टॅग्स :Accidentअपघात