शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भंगारात टाकलेल्या वस्तूंपासून विद्यार्थ्यांनी बनवले ई-व्हेईकल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2020 12:06 IST

ताशी ६० किलोमीटर धावण्याची क्षमता

ठळक मुद्देमहापालिकेच्या आयटीआय विद्यार्थ्यांचा उपक्रम : विविध ठिकाणांहून भंगारातील वाहनांचे पार्ट संकलितही गाडी महापालिकेच्या अंतर्गत कामासाठी वापरण्यात येणार

श्रीकिशन काळे - पुणे : विविध वाहनांच्या टाकाऊ पार्टपासून एखादी इलेक्ट्रिक गाडी बनविता येऊ शकते. हा प्रयोग प्रत्यक्षात उतरविण्याचे काम आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी केले आहे. महापालिकेच्या श्री छत्रपती शिवाजी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील इलेक्ट्रिशियन ट्रेडच्या विद्यार्थ्यांनी ई-व्हेईकल तयार केली असून, या गाडीसाठीचे सर्व पार्ट टाकाऊ वस्तूंपासून घेतले आहेत. ही गाडी महापालिकेच्या अंतर्गत कामासाठी वापरण्यात येणार आहे.आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी यंदा नवीन काही तरी उपक्रम राबविण्याचे ठरविले होते. त्यानुसार विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली  ई-व्हेईकल तयार केली. त्यासाठी टाकून दिलेले वाहनांचे सुटे पार्ट जमा केले. ते जोडून इलेक्ट्रिक गाडी बनविली. या गाडीचा वेग ताशी ६० किलोमीटर आहे. तिची बॅटरी रिचार्जेबल आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक अशी ही गाडी तयार  करून ‘हम भी किसीसे कम नहीं’ असे आयटीआयच्या या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे. या गाडीसाठी इलेक्ट्रिशियन निर्देशक प्रमोद मुळे आणि वर्गशिक्षक नितीन डोखे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर, इलेक्ट्रिशियन द्वितीय वर्षाच्या पुढील विद्यार्थ्यांनी यासाठी परिश्रम घेतले. सैफ अली सारवान, योगेश भोकरे, तानाजी लुगडे, सागर खापरे, हर्षल मरळ, प्रफुल्ल तारू, अनिकेत जगताप, अभिजित शिंदे, अजय भोंडवे, तेजस शिवतारे, केदार कुंभार, शुभम पांगारे, साहिल चीलवंते, विघ्नहर्ता माटे, आदित्य ओंबळे, आदित्य कांबळे, मुकेश दातरंगे, केशव भोरडे, जय पवार, गणेश सोलाट या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. .........पेट्रोल-डिझेल वापरल्यामुळे दररोज कार्बन डायआॅक्साइड वातावरणात जातो. त्याने पुणे शहराचे प्रदूषण वाढत आहे. म्हणून आम्ही कार्बन कमी करण्यासाठी काही तरी नवीन कल्पना समोर आणली. त्यातून आमच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही इलेक्ट्रिक गाडी बनविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार टाकून दिलेले गाड्यांचे पार्ट जमा केले आणि आम्ही  कामाला लागलो. - योगेश भोकरे, विद्यार्थी 

सध्या प्रदूषण खूूप वाढत आहे. त्यामुळे आम्ही पर्यावरणपूरक गाडी बनविण्याचे ठरविले. त्यामध्ये सर्व टाकाऊ वस्तूंचा समावेश आहे. विविध ठिकाणांहून भंगारातील वाहनांचे पार्ट संकलित केले. तसेच, शाईन दुचाकी वाहनाचा सेकंड हॅँडे डिस्क ब्रेक या ई-व्हेईकलला लावला आहे.- नितीन डोखे, मार्गदर्शक  

टॅग्स :Puneपुणेiti collegeआयटीआय कॉलेजStudentविद्यार्थीelectric vehicleवीजेवर चालणारं वाहन