शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

पुणे शहरात सुरू होणार ई-टॉयलेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 3:55 PM

महिलांसाठी प्रत्येकी २ सीटस असलेली १२ व पुरूषांसाठी प्रत्येकी १ सीट असलेली २ अशी एकूण १४ टॉयलेट शहरातील १४ ठिकाणी बसवण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देशौचालय तसेच फक्त स्वच्छतागृह अशा दोन्हीसाठी याचा वापर देखभालदुरूस्ती कंपनीकडून पहिले वर्ष विनामुल्य करण्यात येणार

पुणे: खासदार अनिल शिरोळे यांच्या खासदार निधीमधून शहरात १४ ठिकाणी अत्याधुनिक ई-टॉयलेट बसवण्यास स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या सभेत मान्यता देण्यात आली. यासाठी दोन कोटी रूपयांचा खर्च करण्यात येणार आहे.खासदार शिरोळे यांनीच हा प्रस्ताव महापालिकेला दिला होता. ही टॉयलेट विद्युत शक्तीवर चालणारी आहेत. स्टेनलेस स्टिलची तयार करण्यात आली आहे. त्यात कॉईन टाकली की त्याचे दार खुले होईल. त्याच्या वापरानंतर   ती आपोआप स्वच्छ होतील. बाहेर आले की दार बंद होईल. पुन्हा कॉईन टाकल्याशिवाय दरवाजा खुला होणार नाही. वीज, पाणी यांचा वापर कमीतकमी होतो, त्यामुळे ही टॉयलेट फायदेशीर ठरणार आहेत असे स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक व नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितले. शौचालय तसेच फक्त स्वच्छतागृह अशा दोन्हीसाठी याचा वापर करता येईल. महिलांसाठी प्रत्येकी २ सीटस असलेली १२ व पुरूषांसाठी प्रत्येकी १ सीट असलेली २ अशी एकूण १४ टॉयलेट शहरातील १४ ठिकाणी बसवण्यात येणार आहेत. त्याची देखभालदुरूस्ती कंपनीकडून पहिले वर्ष विनामुल्य करण्यात येणार आहे. त्यानंतर कंपनीला त्यासाठी महापालिकेला शुल्क अदा करावे लागेल. जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, मॉडेल कॉलनी, हिरवाई उद्यान, भैरोबा नाला, गोखलेनगर, रामोशी वस्ती, कामगार पुतळा, कर्वेनगर, मावळे वस्ती, दांडेकर पुल वसाहत आदी ठिकाणी ही शौचालये ठेवण्यात येणार असल्याची माहिती मुळीक यांनी दिली. 

टॅग्स :Puneपुणेanil shiroleअनिल शिरोळे