शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पुण्यात वैद्यकीय अन अंत्यसंस्कारासाठीच मिळतोय 'ई पास'; आत्तापर्यंत तब्बल ६० हजार अर्ज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 14:35 IST

शहरातील शहरात जाण्यासाठीही करताहेत अर्ज : एका दिवसात होतो मंजूर.....

पुणे : राज्य शासनाने लॉकडाऊन करुन संचारबंदी जाहीर केल्याने अत्यावश्यक कारणासाठी जिल्ह्याबाहेर जाणार्‍यांसाठी डिजिटल पासची व्यवस्था केली आहे. मात्र, त्यात प्रामुख्याने वैद्यकीय कारण व जवळच्या नातेवाईकांच्या निधन या दोन प्रमुख कारणासाठी सध्या ई पास दिला जात आहे. विशेष म्हणजे पाससाठी अर्ज केल्यानंतर अर्जाच्या संख्येनुसार तो २४ तासाच्या आत मंजूर होतो. 

तब्बल ६० हजार अर्जई पास सेवा सुरु केल्यानंतर पुणे शहर पोलीस आयुक्तालयात आतापर्यंत तब्बल ५९ हजार ५७७ अर्ज सोमवारी सायंकाळपर्यंत आले होते. पुणे पोलिसांनी आतापर्यंत १६ हजार ७९२ जणांना डिजिटल पास वितरित केला आहे. त्याचवेळी ३१ हजार ७९० अर्ज नामंजूर करुन ते फेटाळण्यात आले आहेत.

ही दिली जातात प्रमुख कारणेया संचारबंदीत केवळ अत्यावश्यक व महत्वाच्या कारणासाठी प्रवासाला मंजुरी देण्यात येणार आहे. त्यामुळे मी अडकून पडलो आहे. लांबच्या नातेवाईकांचे निधन झाले आहे. याशिवाय अत्यावश्यक नसलेली कारणे असल्यास ई पास दिला जात नाही.

ई पाससाठी असा करावा अर्जपोलिसांनी एक वेबसाईटचा पत्ता दिला आहे. त्यावरील अर्ज भरावा़ त्यात प्रामुख्याने प्रवासाचे कारण काय, कधी, कोठे, कोणत्या गाडीने जाणार याची आवश्यक ती माहिती भरावी. तसेच त्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे उदा. कोविड चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट, आधारकार्ड व ज्या कारणासाठी प्रवास करायचा आहे. त्याची पुष्टी देणारी कागदपत्रे जोडावीत. 

जिल्ह्याबाहेर जायचे असेल तर त्यासाठी तुमच्याकडे ई पास आवश्यक आहे. जिल्ह्याच्या शहराच्या सीमेवर तुम्हाला अडविल्यास व तेथे तुमच्याकडे ई पास नसल्यास तेथून तुम्हाला परत माघारी पाठविले जाऊ शकते. 

शहरातल्या शहरात अत्यावश्यक कामासाठी ई पासची आवश्यकता नाही. मात्र, घराबाहेर पडण्यासाठी तुमच्याकडे योग्य व पटेल असे कारण हवे. अनेक जण शहरातल्या शहरात जाण्यासाठी ई पासासाठी अर्ज करतात. तसेच काही जण अत्यावश्यक सेवेत मोडत असतानाही वाहतूकीसाठी अर्ज करतात. अशाचे अर्ज फेटाळण्यात येतात.

किती वेळात मिळतो पासप्रवासासाठी नागरिकांकडून ऑनलाईन अर्ज आल्यानंतर त्यावर प्रक्रिया करण्यासाठी सेवा प्रकल्पात २४ तास कर्मचार्‍याची नियुक्ती करण्यात आली आहे. अर्ज आल्यावर तेथील कर्मचारी अर्जाचे कारण पाहतात. त्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे जोडलेली आहेत का. ज्यांनी अर्ज केला, त्यांचेच आधारकार्ड आहे का. कोविड चाचणीचे निगेटिव्ह रिपोर्ट सोबत जोडला आहे का, याची तपासणी करतात. कारण योग्य वाटल्यास अर्ज मंजूर केला जातो. हे काम काही मिनिटांमध्ये पूर्ण होते. मात्र अनेकदा अर्जांची संख्या खूप असते. त्यामुळे प्रलंबित अर्जांची संख्या अधिक असेल तर साधारण २४ तासात अर्जावर निर्णय होतो. ..........शहर पोलीस दलाने सेवा प्रकल्पात ई पास देण्याची स्वतंत्र सोय केली आहे. अर्जासोबत कोविड टेस्टचा रिपोर्ट असला तरच प्रामुख्याने डिजिटल पास दिले जात आहेत. त्यामुळे अर्जासोबत कोविड टेस्टचा रिपोर्ट अत्यावश्यक आहे. श्रीनिवास घाडगे, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसMedicalवैद्यकीय