शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

ताणतणावाखालची कर्तव्य तत्पर ड्युटी आणि रिकामं पोट..... !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 16:15 IST

जेव्हा कधी समाजातील परिस्थिती चिघळलेली असते तेव्हा तर ते रिकाम्या पोटीच दिवस दिवस नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी घरापासून दुर कुठेतरी रस्त्यावर उभे असतात.

ठळक मुद्दे बऱ्याच पोलिसांच्या ड्यूटीच्या वेळा १२ तासांपासून ४८ पर्यंत वाढल्या

पुणे: त्यांची ड्युटी म्हणजे वेळेचे बंधन नाही. जेव्हा कधी समाजातील परिस्थिती चिघळलेली असते तेव्हा तर ते रिकाम्या पोटीच दिवस दिवस नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी घरापासून दुर कुठेतरी रस्त्यावर उभे असतात. अगदी स्वत:ची क चूक महागात पडू शकते म्हणून ते अक्षरश: डोळ्यात तेल घालून कर्तव्यदक्षता दाखवितात. तसेच काहीसे चित्र गरुवारी (दि.९ आॅगस्ट) पुण्यासह संपूर्ण राज्यात जागोजागी पाहायला मिळाले. बंददरम्यान काही ठिकाणी परिस्थितीने हिंसक वळण घेतले. आणि सर्वसामान्य नागरिकांसह पोलिसांना सुध्दा मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले..घरापासुन लांब असलेल्या व ड्युटीवर डबा न घेवून आलेल्या पोलिसांची देखील दुकाने बंद असल्याने दुपारच्या जेवणाची फारच अडचण झाली. त्यात महिला पोलिसांना जास्त अडचणींना सामोरे जावे लागले. पाण्यासाठी घरोघर पायपीट करावी लागली. ताणतणावाखालच्या मानसिकतेत पोटाची मारामार जास्त थकवा देवून गेली.   सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद ला काही ठिकाणी हिंसक वळण लागले तर काही स्थळी शांततेत पार पडले. पण सर्वच परिसरात कमी जास्त प्रमाणात आंदोलन कर्त्यांच्या रोषात्मक अतिउत्साहाला पोलिसांना सामोरे जावे लागले. कुठे पोलिसांवर दगडफेकही सुध्दा करण्यात आली. अशा प्रसंगांमुळे रक्षण कर्त्यांच्याच जीव धोक्यात येताना आहे.   विशेषत: महिला पोलिसांची कुचंबणा अशा आंदोलना दरम्यान बऱ्याच पोलिसांच्या ड्यूटीच्या वेळा १२ तासांपासून ४८ पर्यंत वाढल्या. त्यामुळे नेहमीच बाहेरच्या खाण्या पिण्यावर अवलंबून असणाऱ्या पोलिसांची गुरवारी पुरती तारांबळ उडाली. बंद दरम्यान महिला पोलिसांची अधिक कुचंबणा झाली. शहरातील कोथरुड, वारजे, कर्वेनगर, सिंहगड रस्ता, हडपसर, धायरी, परिसरात मराठा मोर्चाच्या बंदला सकाळपासून प्रतिसाद मिळाला. या परिसरातील दुकाने, मॉल, सार्वजनिक वाहतुक सेवा बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे सुट्टीच्या दिवशीदेखील पाहायला मिळणार नाही.बाहेरुन शिक्षण-नोकरीसाठी आलेल्या तरुण तरुणींचे खाणावळी तसेच सर्वच हॉटेल बंद राहिल्याने जेवणाची अडचण झाली होती.   

टॅग्स :PuneपुणेMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaharashtra Bandhमहाराष्ट्र बंद