शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

महाविकास आघाडीच्या काळात विकास मंदावला; केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 10:11 IST

या काळात महाराष्ट्राचा विकास मंदावला आणि भ्रष्टाचार फोफावला, केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांचा आरोप

पुणे : महाविकास आघाडी सरकारने केवळ जनकल्याणाच्या योजनांना स्थगिती देण्याचेच काम केले. त्यामुळे या काळात महाराष्ट्राचा विकास मंदावला आणि भ्रष्टाचार फोफावला, असा आरोप केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला. महायुती सरकारच्या काळात लाडकी बहीण योजनेस महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विरोध केला आणि न्यायालयात गेले. पण, आता त्यांनीच स्वतःच्या जाहीरनाम्यात अशीच योजना टाकणे हास्यास्पद आहे, अशी टीकाही त्यांनी केली.यावेळी भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर, संजय मयेकर, पश्चिम महाराष्ट्र माध्यम प्रमुख अमोल कविटकर, उमेश चौधरी, पुष्कर तुळजापूरकर, हेमंत लेले, प्रशांत कोतवाल उपस्थित होते. गजेंद्र सिंह शेखावत म्हणाले, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घरी बसून सरकार चालवले. त्यामुळे करोना काळात अनेकांचा जीव गेला. करोनाकाळात या सरकारने मोठा भ्रष्टाचार केला. तत्कालीन गृहमंत्र्यांंना तुरुंगात जावे लागले. अशा फसव्या आघाडीवर महाराष्ट्रातील जनता विश्वास ठेवणार नाही. 

लाडकी बहीण योजनेचा लाभ अडीच कोटी बहिणींना मिळाला आहे. राजस्थानात फसवी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या काँग्रेसने एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. पर्यटनाला चालना पुण्यातील शिवसृष्टी प्रकल्पाला केंद्राने ८० कोटी रुपयांचे साह्य केले आहे. पुण्यातील ऐतिहासिक वारसा देशातील पर्यटन केंद्रांशी जोडण्याचा आमचा प्रयत्न आहे. राज्यातील दहा किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित व्हावेत, यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. विविध राज्यांनी आठ हजार कोटी रुपयांच्या पर्यटन प्रकल्पांसाठीचे प्रस्ताव पाठवले आहेत, असे गजेंद्र सिंह शेखावत यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Central Governmentकेंद्र सरकारladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचाBJPभाजपाBJPभाजपा