मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत थापलिंग खंडोबाची विधिवत पूजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:09 IST2021-02-05T05:09:01+5:302021-02-05T05:09:01+5:30
उत्तर पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील सर्वांत मोठी यात्रा म्हणून ओळखली जाणारी थापलिंग खंडोबाची यात्रा यंदा कोरोना महामारीमुळे रद्द करण्यात ...

मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत थापलिंग खंडोबाची विधिवत पूजा
उत्तर पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील सर्वांत मोठी यात्रा म्हणून ओळखली जाणारी थापलिंग खंडोबाची यात्रा यंदा कोरोना महामारीमुळे रद्द करण्यात आली. आज आणि उद्या असा दोन दिवस हा यात्रा उत्सव संपन्न होणार होता. मात्र, कोरोनाची स्थिती लक्षात घेता स्थानिक प्रशासन आणि देवस्थान ट्रस्टने यात्रा उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. या यात्रेला पुणे जिल्हा, नगर जिल्ह्यातून भाविक दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर येत असतात. यात्राकाळात भाविकांना गर्दी न करता दर्शन देण्याची व्यवस्था प्रशासनामार्फत केली आहे. मंचर पोलीस ठाण्याच्या वतीने चार अधिकाऱ्यांसह साठ पोलीस जवान या ठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात केले आहेत. गुरुवारी सकाळीच जुन्नर आंबेगाव उपविभागीय अधिकारी सारंग कोडलकर, पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे, पोलीस नाईक विनोद गायकवाड, अजित मडके, पोलीस पाटील संजय पोहकर यांनी भेट देऊन गडावर पाहणी केली. यात्राकाळात कोठेही गर्दी होऊ नये यासाठी थापलिंग देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष देवदत्त निकम यांनी भाविकांनी घरी बसूनच देवदर्शन करावे, असे आवाहन केले आहे.