शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

खड्डे खोदून पानटपऱ्यांमध्ये साठा

By admin | Updated: December 19, 2014 02:00 IST

नशाबाजांना तल्लफ रोखता येईना, टपरीचालकांना पैसे कमविण्याचा मोह आवरेना अशी परिस्थिती सध्या शहरात सर्वत्र दिसून येत आहे. शासनाने गुटखा विक्रीवर बंदी

अमोल जायभाये/ जमीर सय्यद , पिंपरीनशाबाजांना तल्लफ रोखता येईना, टपरीचालकांना पैसे कमविण्याचा मोह आवरेना अशी परिस्थिती सध्या शहरात सर्वत्र दिसून येत आहे. शासनाने गुटखा विक्रीवर बंदी आणली असली तरी गुटखा खाणाऱ्यांवर त्याचा परिणाम झाला नाही. विक्रेत्यांनीही गुटखा विक्री थांबविली नाही. थोडी सावधगिरी बाळगून बंदी असूनही मोठ्या प्रमाणावर छुप्या पद्धतीने गुटखा विक्री होत आहे. पानटपऱ्यांमध्ये खड्डे खोदून गुटख्याचे साठे केले असल्याची खळबळजनक वस्तूस्थिती ‘लोकमत’ टीमने स्टिंग आॅपरेशनद्वारे चव्हाट्यावर आणली आहे.शहराच्या विविध भागांमध्ये असलेल्या पानाच्या टपऱ्या, छोटी हॉटेल, चहाची दुकाने येथे मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री होत असल्याचे दिसून आले. राज्य शासनाने गुटख्यावर बंदी घातली असली तरी तस्करी करुन इतर राज्यातून मोठ्या प्रमाणात गुटख्याच्या पुड्या आणल्या जातात. याचे मोठे रॅकेटच तयार झाले आहे. बिजलीनगर, वाल्हेकरवाडी, आकुर्डी रेल्वे स्टेशन, काळेवाडी, पिंपरी, रहाटणी फाटा, चिंचवड स्टेशन, वाकडेवाडी, म्हाळसाकांत चौक, भोसरी चौक, चिखली, संत तुकाराम नगर पोलिस चौकी, यशवंतराव चव्हाण रुग्णालय, वल्लभनगर एसटी आगार या ठिकाणी अनेक टपऱ्यांवर ‘लोकमत’ प्रतिनिधीनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. नशाबाजांना गुटखा सहज मिळतो, कोठेही उपलब्ध होतो. मात्र, पोलिसांना आणि प्रशासनाला तो पकडता येत नाही. कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकाला १० ते २० पुड्या हाती लागतात. पानटपरी चालकांचे खड्डे खोदून केलेले साठे त्यांना दिसून येत नाहीत. काही ठिकाणी मोठे बॉक्स ठेवलेले असतात. तरी पोलिसांना काहीच सापडत नाही. याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पानटपऱ्यांमध्ये खाली खोदाई करून केलेले गुटख्यांचे साठे याचाच शोध घेण्याचा प्रयत्न होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिसांची मर्जी राखली जात असल्याने टपरी चालकांकडे पोलीस दुर्लक्ष करत असल्याचे दिसून आले आहे. ओळखीच्या व्यक्तींना विक्रीअनेक ठिकाणचे टपरीमालक फक्त नियमित येणाऱ्या आणि ओळखीच्या ग्राहकालाच गुटख्याच्या पुड्या देतात. त्यांच्याकडे अनेकांचे उधारी खातेच असते. ओळखीच्या व्यक्तीला दिले तर कारवाई होण्याचा किंवा कोणाला कळण्याचा धोका राहत नाही. अनोळखी व्यक्तीला पुडी देण्याचे ते टाळतात. संत तुकाराम नगर पोलिस चौकी शेजारी असलेल्या एका टपरीवर गुटखा मिळतो. येथे एवढ्या जवळ पोलिस चौकी असून सुद्धा विक्री केली जात आहे. त्याकडे पोलिस दुर्लक्ष करत असल्याचे दिसते, तर यशवंतराव चव्हाण रुग्णालयाजवळ मोठ्या प्रमाणावर राजरोसपणे गुटखा विक्री होत आहे. लहान मुलांना वाईट सवय आकुर्डी रेल्वे स्टेशन जवळील एका पान टपरी शेटारी थांबलो होतो. तेथे एक १० ते १२ वर्षाची मुलगी आली तिने रुमाल पुढे केला. त्यामध्ये टपरीवाल्याने दोन पुड्या टाकल्या तिने रुमालाची घडी केली आणि तेथून धूम ठोकली. लहान मुलांकडून अशी कामे करून घेतली जात आहेत. माव्यालाही पसंतीकाही टपऱ्यांवर सुगंधी तंबाखू सुपारीत मिसळवून अनेक ग्राहकांना मावा दिला जातो. त्याचीही विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. मावा २० ते ३० रुपयाला विकला जातो.